esakal | "कर हर मैदान फतेह! महापालिकेवर कॉंग्रेसचा झेंडा फडकवणारच'
sakal

बोलून बातमी शोधा

Congress

"कर हर मैदान फतेह! महापालिकेवर कॉंग्रेसचा झेंडा फडकवणारच'

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

आमदार शिंदे म्हणाल्या, कॉंग्रेस पक्ष, मी आणि आम्ही सर्वजण संपूर्ण ताकदीने पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असून, सोलापूर महापालिकेवर कॉंग्रेस पक्षाचा झेंडा फडकावणारच.

सोलापूर : येत्या काही महिन्यांत सोलापूर महानगरपालिकेची (Solapur Municipal Corporation) निवडणूक लागणार आहे. महापालिका निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. कॉंग्रेस (Congress) पक्ष, मी आणि आम्ही सर्वजण संपूर्ण ताकदीने पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असून, सोलापूर महापालिकेवर कॉंग्रेस पक्षाचा झेंडा फडकावणारच, या दृष्टीने तयारीला लागा. "कर हर मैदान फतेह' असे म्हणत आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde) यांनी महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डाची लढाई जिंकणारच, असा एल्गार केला. (MLA Praniti Shinde expressed confidence that the Congress flag will be hoisted on the upcoming Solapur Municipal Corporation election-ssd73)

हेही वाचा: मुख्यमंत्र्यांसह शासकीय महापूजेचा मान कोलते दाम्पत्याला !

आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक तयारी संदर्भात सोलापूर शहर कॉंग्रेस कमिटी ब्लॉक, फ्रंटल सेल पदाधिकाऱ्यांची बैठक महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या वेळी शहराध्यक्ष प्रकाश वाले, ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, गटनेते चेतन नरोटे, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, मनोज यलगुलवार, माजी महापौर यू. एन. बेरिया यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल लोटस येथे पार पडली.

हेही वाचा: आमदार प्रणिती शिंदे यांना मिळणार मंत्रिपद !

बैठकीस जेष्ठ नगरसेवक शिवा बाटलीवाला, रियाज हुंडेकरी, नरसिंग कोळी, विनोद भोसले, तौफिक हत्तुरे, प्रवीण निकाळजे, स्थापत्य समिती सभापती अनुराधा काटकर, नगरसेविका परवीन इनामदार, फिरदोस पटेल, वैष्णवी करगुळे, ब्लॉक अध्यक्ष अरुण साठे, देवा गायकवाड, बाबूराव म्हेत्रे, लक्ष्मीकांत साका, उदयशंकर चाकोते, सरचिटणीस मनीष गडदे, युवक अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, एनएसयूआय जिल्हाध्यक्ष गणेश डोंगरे, भटक्‍या विमुक्त विभाग अध्यक्ष भारत जाधव, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, उदयोग वाणिज्य सेलचे पशुपती माशाळ, भटक्‍या विमुक्त युवक अध्यक्ष पवन गायकवाड, कामगार सेलचे सायमन गट्टू, श्रद्धा आबुटे, प्रियांका डोंगरे, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल म्हणाले की, मी कुठेही गेलो नाही, मी सुशीलकुमार शिंदे आणि कॉंग्रेसचा सच्चा सेवक असून आगामी महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी हर तऱ्हेने प्रयत्न करून महापालिकेवर तिरंगा फडकवणार.

loading image