
Solapur Fraud:
बार्शी : मुंबईमध्ये पाण्याच्या बाटल्यांचा व्यवसाय करणाऱ्या अन् बार्शीचा रहिवासी असलेल्या व्यापाऱ्याची १२ लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली. नागोबाचीवाडी (ता. बार्शी) येथील नातेवाइकाच्याच माध्यमातून एकाने आपण पोकलेन मशिनचा व्यवसाय भागीदारीमध्ये करू, असे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.