पंढरपूर शहर तालुक्यात अवैध धंदे जोमात, पोलिस यंत्रणा कोमात

वाढत्या अवैध धंद्यामुळे शहर तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
 illegal business
illegal businessSakal

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर (Pandharpur) शहर व तालुक्यासाठी स्वतंत्र उपविभागीय पोलिस अधिकारी व त्यांची पोलिस यंत्रणा असतानाही मागील काही महिन्यांपासून शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा, मटका, जुगार,हाताभट्टी यासह अनेक अवैध धंदे जोमात सुरु आहेत. वाढत्या अवैध धंद्यामुळे (Illegal Business) शहर तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे सगळे खुलेआम सुरु असताना ही पंढरपूरचे वरिष्ठ पोलिस अधिकारी करतायत तरी काय असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे.

पंढरपूर हे तीर्थत्र असल्याने येथे बाहेरगावाहून येणार्या भाविकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे उपविभागीय पोलिस अधिकार्यांसह पंढरपूर शहरासाठी व विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी स्वतंत्र पोलिस यंत्रणा आहे. तगडी पोलिस यंत्रणा असतानाही शहर व तालुक्यात अवैध धंद्यासह भुर्टया चोर्यांचे प्रमाण वाढले आहे. अशा वाढत्या घटनांमुळे शहर व तालुक्यातील नागरिक हवालदिल झाले आहेत.

 illegal business
शिवरायांचा अवमान; बेळगावात दगडफेक, आज शिवप्रेमींचा मोर्चा

गोपाळपूर येथे विष्णुपद दर्शनासाठी येणार्या महिला भाविकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिणे चोरीचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या चोर्या आणि अवैधंद्यामुळे पंढरपूरच्या वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्याच कार्तव्यविषयी आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मार्गशिर्ष महिना सुरु असल्याने गोपाळपूर येथे विष्णुपद दर्शऩासाठी महिला भाविकांची गर्दी वाढली आहे. याचाच गैरफायदा घेवून चोरटे हात साफ करत आहेत.अलीकडेच येथे दर्शऩासाठी आलेल्या संपदा सुधीर पिटके (रा.पंढरपूर) यांच्या गळ्यातील 25 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिणे चोरट्यांनी लंपास केले. मंदाबाई बबन भगत (रा.सांगोला) यांच्याही गळ्यातील 32 हजार 500 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याशिवाय लिलावती ज्ञानेश्वर शिंदे (रा. अनवली (ता. पंढरपूर), नागेंद्र वेंकन्ना अनंतवार ( रा. कारेगाव रोड परभणी), अरुण

कृष्णात गुरव ( इस्मालापूर) यांचेही चोरांनी लाखो रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे व रोख रक्कम चोरुन नेली. वाढत्या चोर्यांच्या घटनांमुळे पंढरपूरला येणार्या भाविकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या चोर्यांबरोबरच अवैध वाळू वाहतूक, मटका, जुगार, हातभट्टी दारु विक्री यासह इतर अवैध धंदे खुलेआम शहर व तालुक्यात सुरु आहेत. याकडे खुद्द पंढरपूरच्या उपविभागीय पोलिस अधिकार्यांचेच दुर्लक्ष असल्याची चर्चा सुरु आहे. पंढरपुरातील वाढते अवैध धंदे रोखण्यासाठी आता वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनीच लक्ष घालावे अशी मागणी शहर व तालुक्यातील नागरिकांमधून केली जात आहे.

 illegal business
शिवपुतळा विटंबना निषेधार्थ संकेश्वरला निषेध फेरी

पंढरपूरसाठी स्वतंत्रपणे लक्ष घातले जाईल

पंढरपूर शहर व तालुक्यात कुठे अवैध धंदे व चोर्या होत असतील तर

यापुढे स्वतंत्रणपे लक्ष दिले जाईल. चोरांचा शोध घेण्यासाठी स्थानिक

पोलिस अधिकार्यांना तसे आदेश दिले आहेत. अवैध वाळू वाहतूकच्या प्रश्नी

देखील लक्ष घालून कारवाई केली जाईल. पंढरपूर येथील संबंधत अधिकार्यांनाही

तशा सूचना दिल्या जातील.

- हिम्मत जाधव, अपर पोलिस अधिक्षीक ग्रामीण

सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com