

Farmers Intensify Protest Demanding Timely FRP Payment
Sakal
मोहोळ: पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणाऱ्या जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या आंदोलनाला यश आले आहे. ज्या कारखान्यांनी एफआरपीची रक्कम वेळेत दिली नाही, त्या साखर कारखान्या कडून वार्षिक १५ टक्के व्याज वसूल करून शेतकऱ्यांना देण्याचे आदेश साखर सह संचालकांनी दिले आहेत. साखर कारखान्यांच्या वजन काट्यांच्या तपासणी वेळी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी घेण्याची मागणीही मान्य करण्यात आली असल्याची माहिती प्रभाकर देशमुख यांनी दिली.