
सोलापूर : कमी दिवसांत जादा पैसे कमाविण्याचे आमिष दाखवून सोलापूर जिल्ह्यातील एक हजारांहून अधिक जणांना ३६ कोटींचा गंडा घालणाऱ्या २३ जणांविरुद्ध पोलिसांनी माढा न्यायालयात तब्बल चार हजार ९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. संशयित आरोपी छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कुर्डुवाडी, बार्शी तालुक्यातील आहेत. त्यांनी एकमेकांच्या ओळखीतून तरुणांना जादा नफ्याचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. एक रुपयाला ३६ रुपये मिळतात, असे त्यांचे आमिष होते.