Praniti Shinde: प्रणिती शिंदेंची आता दिल्लीतून राजकीय इनिंग; मिळाली आणखी एक संधी

सर्वात कमी वयात काँग्रेस वर्किंग कमिटीत विशेष निमंत्रित म्हणून संधी
mla praniti shinde
mla praniti shindesakal

काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे यांनी पावणेदोन वर्षांनंतर वर्किंग कमिटी जाहीर केली आहे. त्यात महाराष्ट्रातील आठजणांची वर्णी लागली आहे. आमदार यशोमती ठाकूर व प्रणिती शिंदे यांना विशेष निमंत्रित म्हणून संधी मिळाली आहे. प्रणितींना कमी वयात राष्ट्रीय स्तरावर संधी मिळाल्याने त्यांची पुढील राजकीय इनिंग दिल्लीतून असणार, अशी चर्चा आहे.

महाराष्ट्रातून संधी मिळालेल्या आमदार प्रणिती शिंदे या सर्वांत तरुण आहेत. त्या सध्या ‘सोलापूर मध्य’ या मतदारसंघातून काँग्रेसचे प्रतिनिधित्व करत आहेत. तसेच, काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा म्हणूनही त्यांच्यावर जबाबदारी आहे. त्यांनी पहिल्यांदा २००९ मध्ये शहर मध्य मतदारसंघ काबीज केला. त्यानंतर त्यांनी मोदी लाटेतही २०१४ व २०१९ मध्ये विजय मिळवून आमदारकीची हॅट्‌ट्रिक केली.

mla praniti shinde
Dilip Walse Patil: शरद पवारांवरील टीकेवर वळसे पाटलांचा यू-टर्न; स्पष्टीकरण देताना म्हणाले, 'मी खंत व्यक्त...'

विशेषतः वातावरण विरोधात आणि विरोधकांची गर्दी असतानाही त्यांनी बाजी पलटवून दाखवली. त्यांची विधानसभेतील कामगिरी पाहून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्याध्यक्षपदाची धुरा त्यांच्यावर सोपविली. ‘भारत जोडो’त अमरावती विभागाची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांनी अतिशय चोखपणे ती जबाबदारी पार पाडली.

त्यादरम्यानच राहुल गांधी यांच्यासोबत त्या यात्रेत पाहायला मिळाल्या. विशेषतः पक्षाची भूमिका त्या बेधडकपणे मांडतात. ‘कोण रोहित पवार’ हा सवालही त्याच श्रेणीतला. एकंदरीतच, त्यांच्या राजकीय कमानीचा आलेख वाढत चालला असून, काँग्रेस वर्किंग कमिटीवरील निवडीने त्यांचे पक्षातील वजन पुन्हा अधोरेखित झाले आहे.

mla praniti shinde
धक्कादायक! बोट छाटलेल्या प्रकरणात सरकारमधील दोन मंत्री आरोपी; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

लोकसभेचा चेहरा प्रणितीच असू शकतात

प्रणिती शिंदे यांना राष्ट्रीय स्तरावर मिळालेली संधी पाहता, त्यांच्या लोकसभा उमेदवारीला पुष्टी देणारी ठरते. काँग्रेसच्या आढावा बैठकीतही त्यांच्याच उमेदवारीचा आग्रह धरण्यात आला. सुशीलकुमार शिंदे यांचे वय आणि त्यांची निवडणूक लढविण्याची ‘ना’ पाहता प्रणिती या सोलापूरमधून लोकसभा उमेदवारीच्या प्रबळ दावेदार ठरतात.

भाजपच्या उमेदवाराला पराभूत करण्याची निर्णायक ताकद प्रणिती शिंदेंकडेच असल्याची स्थिती आहे. तरीपण, कदाचित लोकसभेला पराभव झाल्यास त्यांना ‘सोलापूर मध्य’ हा हक्काचा विधानसभा मतदारसंघ आहेच. त्यामुळे प्रणितींची उमेदवारी काँग्रेससाठी दुहेरी फायद्याची ठरू शकते.

mla praniti shinde
Maharashtra Politics: दानवेंच्या मुलाचा साखरपुडा शिरसाटांचा गोडवा, कट्टर विरोधकांच्या त्या फोटोमुळे भुवया उंचावल्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com