खासगी लसीकरणासाठी 88 प्रस्ताव ! एका बाटलीतून बारा जणांना डोस

कोरोना लसीकरणासाठी खासगी रुग्णालयांनी प्रस्ताव दिले आहेत
vaccination
vaccinationMedia Gallery
Summary

लसीच्या एका बाटलीतून 12 जणांना लस टोचली जात आहे. साधारणपणे एका बाटलीतून दहा जणांना लस टोचणे अपेक्षित आहे.

सोलापूर : कोरोना (Covid-19) वाढत असल्याने स्वत:च्या बचावासाठी पैसे देऊन लस घेण्याचीही नागरिकांची तयारी आहे. या पार्श्‍वभूमीवर मुंबई, पुणे येथे खासगी रुग्णालयांतून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर सोलापूर शहर- जिल्ह्यातील 66 रुग्णालयांसह चार कारखाने व आठ उद्योजकांनी उत्पादकांकडून लस खरेदी करून लसीकरणास (Covid-19 Vaccination) परवानगी मिळावी, असे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहेत. (Private hospitals have made proposals for corona vaccination)

vaccination
वेळापूर पारधी वस्तीत पोलिसांवर जीवघेणा हल्ला! पीआयसह दोन पोलिस जखमी

जिल्ह्यात लसीकरणासाठी गर्दी वाढत असतानाच सरकारकडून मिळणारी लस कमी पडू लागली आहे. जिल्ह्यातील 18 वर्षांवरील 30 लाख जणांना लस टोचण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, फेब्रुवारी 2021 पासून आतापर्यंत जिल्ह्यासाठी पाच लाख 43 हजार 350 डोस मिळाले आहेत. आता लसीकरण केंद्रांबाहेर नागरिकांच्या रांगा लागत असून लस संपल्याने अनेकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. या त्रासाला वैतागून अनेकांनी पैसे देऊन लस टोचण्याची तयारी दर्शविली आहे. लसीकरणासाठी वाढलेल्या गर्दीचा अंदाज घेऊन शहर- जिल्ह्यातील 66 खासगी रुग्णालयांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लसीकरणास परवानगी मागितली आहे. त्यावर अजूनही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Collector Milind Shambharkar) यांनी निर्णय घेतला नसून, त्यांच्याकडून परवानगी मिळाल्यानंतर ही रुग्णालये थेट लस उत्पादकांकडून लस खरेदी करतील. त्यानंतर शासनाने ठरवून दिलेल्या किमतीत लसीकरण करणार आहे. लसीकरणासाठी परवानगी मागणाऱ्या रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील (Mahatma Phule Jana arogya Yojana) 36 तर ग्रामीण भागातील 30 खासगी रुग्णालयांचा समावेश आहे.

vaccination
चंद्रभागा नदीत एका महिलेसह मुलगा गेला वाहून !

लस वितरीत 5.15 लाख; लसीकरण 5.32 लाख व्यक्‍तींचे

जिल्ह्यातील 30 लाख नागरिकांना लस टोचण्याचे उद्दिष्ट ठरविल्यानंतर प्रशासनाने शहर- ग्रामीणमधील 339 केंद्रांवरून लसीकरणाचे नियोजन केले. त्यातील 130 केंद्रे आता सुरू असून पुरेशा प्रमाणात मागणीनुसार लस मिळत नसल्याने अद्याप उर्वरित केंद्रे बंदच ठेवावी लागत आहेत. तरीही, लस टोचून घ्यायला आलेली व्यक्‍ती परत जाणार नाही, याची खबरदारी घेत लसीच्या एका बाटलीतून 12 जणांना लस टोचली जात आहे. साधारणपणे लसीच्या एका बाटलीतून दहा जणांना लस टोचणे अपेक्षित आहे. मात्र, एका बाटलीतून 12 जणांना लस टोचता येऊ शकते, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यात लसीकरण सुरू असून आतापर्यंत पाच लाख 15 हजार 190 डोस शहर- जिल्ह्यासाठी देण्यात आले. ही लस पाच लाख 31 हजार 988 जणांना टोचण्यात आली आहे.

कामगारांसाठी 12 औद्योगिक संस्थांचाही प्रस्ताव

कोरोनाच्या काळात कामगारांच्या सुरक्षिततेसाठी शहर- जिल्ह्यातील 12 औद्योगिक संस्थांनीही जिल्हाधिकाऱ्यांकडे लसीकरणासाठी परवानगी मागितली आहे. लस उत्पादकांकडून थेट लस खरेदी करून आम्ही लसीकरण करू, असेही त्या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रिसिजन कंपनी, गोकूळ शुगर, लोकमंगल साखर कारखाना (भंडारकवठे), जय हिंद शुगर (आचेगाव), शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना (यशवंत नगर), अल्ट्राटेक सिमेंट, चेट्टीनाड सिमेंट, झुआरी सिमेंट, कोठारी ऍग्रो कंपनी (चिंचोळी एमआयडीसी), एनटीपीसी (फताटेवाडी), मंछुकोंडा प्रकाशम कंपनी (कासेगाव, ता. दक्षिण सोलापूर), तिरुमला प्रेसिकास्ट्‌स कंपनी, पॉवरग्रीड कॉर्पोरेशन कंपनी (अक्‍कलकोट, लिंबी), अक्‍कलकोट रोड एमआयडीसी अशा 12 औद्योगिक संस्थांचा त्यात समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com