esakal | खुषखबर ! गाड्यांच्या वेग वाढीला रेल्वे बोर्डाची मान्यता 

बोलून बातमी शोधा

Mumbai-Chennai_Express
  • मुंबई- चेन्नई एक्‍स्प्रेस, मुंबई- चेन्नई मेल एक्‍स्प्रेसचा वाढणार वेग 
  • दादर- चेन्नई एक्‍स्प्रेसच्या वेग वाढीचा रेल्वे बोर्डाचा निर्णय 
  • 1 जुलैपासून होणार नव्या निर्णयाची अंमलबजावणी 
  • रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकासह स्थानकांमध्येही होणार बदल 
खुषखबर ! गाड्यांच्या वेग वाढीला रेल्वे बोर्डाची मान्यता 
sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : केंद्रीय रेल्वे बोर्डाने मुंबई- चेन्नई एक्‍स्प्रेस, मुंबई- चेन्नई मेल एक्‍स्प्रेस, दादर- चेन्नई सुपरफास्ट एक्‍स्प्रेसच्या वेग वाढीला मान्यता दिली आहे. 1 जुलैपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. मुंबई- चेन्नई मेल रेल्वे मुंबईहून सुटून चेन्नई सेंट्रलऐवजी चेन्नई एग्मोरला जाईल. रेल्वे बोर्डाच्या या निर्णयामुळे कन्याकुमारी- मुंबई, मुंबई- हैदराबाद, मदुराई- एलटीटी (साप्ताहिक), एलटीटी- कोईम्बतूर एक्‍स्प्रेस, चेन्नई सेंट्रल- एलटीटी एक्‍स्प्रेसच्या रेल्वे गाड्यांचाही वेग बदलणार आहे. 

हेही नक्‍की वाचा : बळीराजासाठी गूड न्यूज ! कर्जमाफीची 28 फेब्रुवारीला दुसरी यादी 


सुपरफास्टमध्ये रुपांतरित झाल्यानंतर एक्‍स्प्रेस गाड्यांच्या वेळात बदल होणार आहे. मुंबई- चेन्नई मेल सुपरफास्ट व चेन्नई- मुंबई मेल सुपरफास्ट दादर, कल्याण, लोणावळा, खडकी, पुणे, दौण्ड, कुर्डूवाडी, सोलापूर, अक्‍कलकोट रोड, दुधनी, गंगापूर रोड, कलबुर्गी, शहाबाद, वाडी, नलवार, यादगीर, सैदापूर, कृष्णा, रायचूर, मांतमरी, मंत्रालय रोड, कोसगी, कुप्पगल, अडोनी, नगरुर, गुंटकल, रेनिगुंटा, रायलाचेरुरु, तडीपत्री, कोंडापुरम, मुद्दनुरु, येरगुंटला, कमलापुरम, कड्डापा, नंदालूर, रजमपेता, कोडूर, रेनिगुंटा, अर्कोनम जं. पेरंबूर अशी धावणार आहे. मुंबई- चेन्नई व चेन्नई मुंबई सुपरफास्ट एक्‍स्प्रेस रेल्वे दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, खडकी, पुणे, दौण्ड, कुर्डूवाडी, सोलापूर, कलबुर्गी, शहाबाद, वाडी, यादगीर, कृष्णा, रायचूर, मंत्रालय रोड, अडोनी, गुंटकल, गुट्टी, तडीपत्री, कोंडापुरम, कुडणपुरा, येरागुंटल, कमळगुरु, नंदातूर, रजमपेता, कोडूर, रेनिगुंटा, पुनूर, तिरुपनी, अर्कोनम जं., पेरंबूर अशी धावेल. एलटीटी- चेन्नई सेंट्रल व चेन्नई सेंट्रल- एलटीटी एक्‍स्प्रेस कल्याण, लोणावळा, पुणे, सोलापूर, कलबुर्गी, वाडी, यादगीर, सैदापूर, रायचूर, मंत्रालय रोड, अडोनी, गुंटकल, गुट्टी, तडीपत्री, येरगुंटाला, कुडपाळ, रजमपेटा, कोडूर, रेनिगुंटा, पेरंबूर अशी धावणार आहे. 

हेही नक्‍की वाचा : वाहनचालकांसाठी ! बीएस-फोर वाहनांची नोंदणी बंद 


असा असणार नवा बदल 
मुंबई- चेन्नई मेल एक्‍स्प्रेस व चेन्नई- मुंबई मेल सुपरफास्ट एक्‍स्प्रेसचे टर्मिनल मुंबई- चेन्नई सेंट्रल- मुंबई मेल चेन्नई सेंट्रलऐवजी चेन्नई एग्मोर येथे हलविण्यात येणार आहे. दादर (टी)- चेन्नई एक्‍स्प्रेसचे टर्मिनल दादर (टी) येथून लोकमान्य टिळक टर्मिनल येथे हलविण्यात येणार आहे. तसेच चेन्नई एग्मोरऐवजी चेन्नई सेंट्रल येथे समाप्त केले जाणार आहे. रेल्वे बोर्डाच्या निर्णयानंतर गाड्यांच्या स्थानकांमध्येही बदल केला जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले. 


हेही नक्‍की वाचा : वाचक संख्या मर्यादित...! मराठी वाचनालयातून अनुदानाची दुकानदारी