

CNG supply review meeting chaired by Resident Deputy Collector Patil; strict instructions issued to IMC, MIDC, and supply officials.
Sakal
सोलापूर : एमआयडीसीने नोटीस दिल्यानंतर चिंचोली एमआयडीसीतील सीएनजी पंप मंगळवारपासून बंद करण्यात आला आहे. सोलापूर व परिसरातील सीएनजीच्या वाहनांसाठी या पंपावरून हमखास गॅस मिळत होता. आता हाच पंप झाल्याने आज दिवसभर सीएनजीचा तुटवडा प्रकर्षाने जाणवला. सीएनजी मिळत नसल्याने सोलापूर शहर व जिल्ह्यातील सीएनजी वाहनधारकांची तारांबळ उडाली आहे. जिल्ह्यातील सीएनजी पुरवठा दोन दिवसात सुरळीत करा, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी दिल्या आहेत.