.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील पावसासाठी २०२५ हे वर्ष अविस्मरणीय ठरू लागले आहे. यंदा कधी नव्हे ते मे महिन्यात २३२ मिलिमीटर पाऊस झाला. जून व जुलैमध्ये पावसाने ओढ दिली. परंतु ऑगस्टपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली. सध्याचा पाऊस हा नियमित पाऊस असून परतीच्या पावसाला १ सप्टेंबरपासून सुरुवात होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीला येणारा परतीचा पाऊस हा ऑक्टोबरपर्यंत राहील, अशी शक्यता आहे. यंदा परतीच्या पावसाचेही दिवस वाढण्याची शक्यता आहे.