शेततळ्यात पडून आईसह चिमुकलींचा मृत्यू

पाथरीतील घटना; आत्महत्या की पाय घसरून पडल्याची चौकशी सुरू
Drowning
Drowningsakal media
Updated on

सोलापूर : बागायती शेती, शेतात द्राक्ष बाग आणि त्या बागेला पाणी देण्यासाठी शेतात शेततळे तयार केले होते. शुक्रवारी (ता. २१) दुपारी दोनच्या सुमारास द्राक्ष बागेतील पाखरे हाकायला गेल्यानंतर आईसह दोन चिमुकलींचा त्या शेततळ्यात पडून मृत्यू झाल्याची घटना पाथरी (ता. उत्तर सोलापूर) येथे घडली.

Drowning
'नीरा देवघर’च्या कामांसाठी केंद्राकडून निधी देऊ

अक्षय ढेकळे यांचे शेतातच घर असून त्यांची पत्नी सारिका अक्षय ढेकळे (वय २२), गौरी अक्षय ढेकळे (वय ४) आणि आरोही (वय २) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पाण्यात पाय घसरून मृत्यू झाला की त्यांनी मुलींसह आत्महत्या केली, याचा तपास तालुका पोलिस ठाणे करीत आहे. शेततळ्यात पडून तिघांचा मृत्यू होण्याची ही जानेवारीतील दुसरी घटना आहे. मार्डी (ता. उत्तर सोलापूर) याठिकाणी काही दिवसांपूर्वी तीन मुलींचा पाय घसरुन मृत्यू झाला होता. त्यांनतर आता पाथरी या गावात ही घटना घडली आहे. पाथरी येथील दोन आणि चार वर्षांच्या मुलींसह त्यांच्या आईचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी त्यासंबंधीची सखोल चौकशी सुरु केली आहे. त्या तिघी पाय घसरुन पडल्याने मृत्यू झाला की त्यांनी आत्महत्या केली, यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरु केला आहे. दरम्यान, शेतातील बागेत पाखरे राखायला गेल्यानंतर त्या तिघींचा मृत्यू झाल्याचे मृतांच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले आहे.

घटनास्थळी तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस पथक जाऊन पंचनामा करीत असल्याची माहिती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण फुगे यांनी दिली. लोहारा तालुक्‍यातील नंदगाव हे मृत सारिका ढेकळे यांचे माहेर आहे. तपास तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण फुगे हे करीत आहेत.

Drowning
सातारा जिल्ह्यात 111 कामांसाठी 8.33 कोटी निधी मंजूर

आई दुपारीच गेली होती गावी

मयत सारिका ढेकळे यांची आई मुलीच्या सासरी आली होती. त्या शुक्रवारी (ता. २१) दुपारीच मुलीच्या सासरहून नंदगाव (ता. लोहारा) येथे गेल्या होत्या. त्या घरी पोहोचताच त्यांना मुलीच्या मृत्यूची खबर मिळाली आणि गेल्या पावली त्या परतल्या. दरम्यान, अक्षय ढेकळे यांच्या शेतात बोअर पाडला होता. द्राक्ष बागेला पाणी लागत असल्याने त्यांनी तीन-चार वर्षांपूर्वी शेतात पाणीसाठा करण्यासाठी शेततळे खोदले होते.

Drowning
रखडलेल्या कामांसाठी निधी मंजूर; जिल्हाधिकाऱ्यांचा मंगळवेढा दौरा यशस्वी

पाथरी येथील आईसह दोन लहान मुलींचा शेततळ्यात पडून मृत्यू झाला आहे. त्याची सखोल चौकशी केली जाईल आणि त्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. शेतातील पाखरे राखायला गेल्यानंतर शेततळ्यात पडल्याची नातेवाईकांनी सांगितले आहे.

- हिंमत जाधव, अप्पर पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shaktipeeth Highway Protest raju shetti in solapur
Devotees Shocked in Pandharpur After Claims of Paid Vithal Darshan Surface
Cattle Transport Truck Meets With Accident in Solapur’s Mohol Taluka
ATM Pulled Out and Fled in Car; Major Theft Incident Shocks Solapur
Marathi News Esakal
www.esakal.com