Solapur : "निधी ठेकेदारांना जगवण्यासाठी नाही तर .." दुष्काळी भागातील आमदाराची अधिकाऱ्यांना तंबी

नागरिकांना धमकावले तर काम करणं आणि राहणं अवघड होईल आ. अवताडेचा इशारा
Solapur news
Solapur newsesakal

Solapur : मंगळवेढा ता. 20 सकाळ वृत्तसेवा जलजीवन पाणी योजनेच्या कामातील जिल्ह्याची परिस्थिती पाहता मंगळवेढ्यात तशी परिस्थिती मी खपवून घेणार नाही या भागात तक्रारी आहेत त्याठिकाणी ठेकेदाराच्या माध्यमातून नागरिकावर गुन्ह्याची भिती दाखवून दबाव आणू नयेत जर तशी भूमिका घेतली तर काम करणं आणि इथं राहणं अवघड होईल असा गंभीर इशारा आ. समाधान आवताडे यांनी ग्रामीण पाणीपुरवठा खात्याचा अधिकाऱ्यांना दिला.

Solapur news
Health Tips: तंदुरी रोटीवर ताव मारताय तर सावध व्हा! हे आहेत त्याचे भयंकर Side Effects

तालुक्यातील खरीप पेरणी हंगाम, पी एम किसान योजना, जलजीवन व भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामाच्या आढाव्यासाठी येथील लक्ष्मीनारायण मंगल करण्यात बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते त्यावेळी आ.आवताडे यांनी हा इशारा दिला.

Solapur news
Cars Under 10 Lakh: कार घेण्याचा विचार करताय?पाहा स्वस्त अन् मस्त पर्याय

यावेळी उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब समिंदर,गटविकास अधिकारी शिवाजी पाटील,नायब तहसीलदार सुधाकर धाईंजे,ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता राजकुमार महावितरण चे शाखा अभियंता सचिन कोळेकर,नियोजन सदस्य प्रदीप खांडेकर,दिलीप चव्हाण,प्रा.येताळा भगत,दत्तात्रय जमदाडे,सहायक कार्यक्रम अधिकारी प्रशांत ढगे,दिगंबर यादव,बापू मेटकरी रावसाहेब पटेल प्रकाश रोहिटे,महादेव साखरे आदी उपस्थित होते.

तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे यांनी खरीप पेरणीपूर्व वर्षभरात कृषी खात्याने राबवलेल्या विविध योजनेची माहिती दिली,खताची टंचाई होऊ नये म्हणून शेतकऱ्याने संतुलित खताचे वापर करावा. सेंद्रिय खताचा वापर वाढवण्याचे आवाहन केले.

Solapur news
Diesel Car : डिझेलवर चालणारी कार खरेदी करत असाल तर थांबा! डिझेल वाहनांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव

जास्त तुर व सूर्यफूल उत्पादक शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. आ.अवताडे यांनी खरीप हंगामात खताची टंचाई होऊ नये व बोगस बियाणे विक्री करणाऱ्यावर कारवाई करावी, सूर्यफूल बियाण्याची व खताचे टंचाई होऊ नये यासाठी सूचना दिल्या. पी एम किसान योजनेचा आढावा नायब तहसीलदार सुधाकर धाईजे यांनी सांगितला, संजय पवार यांनी सर्कल चौकशीचा त्रास हा त्रास बंद करण्याची मागणी केली.

Solapur news
Apple iPhone 16 : पहिल्यांदाच इतक्या मोठ्या स्क्रीनसह लॉन्च होणार आयफोन

शेतकऱ्यानी या योजनेच्या लाभासाठी केलेल्या अर्जावर लवकर निपटारा होत नाही नसल्याची तक्रार केली. व नवीन नोंदणी तात्काळ होत नाही यावर आ. आवताडे यांनी शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारने मिळणाऱ्या अनुदानापासून वंचित ठेवू नये तसा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असा इशारा दिला.

Solapur news
JioDive VR : Jio करणार Apple आणि Google ची सुट्टी, लाँच करणार सर्वात स्वस्त VR हेडसेट

शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी बँका सिबिलसाठी अडवणूक करत असल्याच्या तक्रारीव लिड बॅंकेचे अधिकारी व तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवस्थापक,उप व्यवस्थापक यांची सोमवारी बैठक घेऊन शेतकऱ्यांची अडवणूक न करता तात्काळ पीक कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. भोसे प्रादेशिक योजनेचे पाणी सुरू करण्याबाबत संदर्भात गटविकास अधिकारी स्तरावरून 35 लाख रुपये वीज बिलापोटी भरल्याचे सांगण्यात आले. ज्या सहा गावाला पाणी मिळत नाही.त्यांना तात्काळ पाणी उपलब्ध करून द्यावे अन्यथा त्यासाठी जबाबदार धरण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण च्या अधिकाऱ्यांना देण्यात आला.

Solapur news
Car Black Film Windows : बंदी असतानाही गाड्यांच्या काचांवर ब्लॅक फिल्म लावता येते का? नियम काय सांगतो

योजना हस्तांतरित करण्यापूर्वी ची वीज बिल महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून भरण्यात यावे. भरलेल्या वीजबिलातील 17 लाख व दुरुस्ती दहा लाख रुपये उपलब्ध करून देण्याचे आश्वासन यावेळी अधिकाऱ्याने दिल्यावर आ. अवताडे यांनी ठेकेदार जगवण्यासाठी निधी उपलब्ध करू नका लोकांना पाणी देण्यासाठी निधी उपलब्ध करा अशी तंबी देण्यात आली.जलजीवन योजनेचे निंबोणीतील कामात अधिकाऱ्यांनी टक्केवारी घेऊन ठेकेदारच बदलण्याची तक्रार भारत ढगे यांनी केली तर डोंगरगाव येथील वाडीवस्तीचा समावेश यामध्ये करावा अशी मागणी विवेक खिलारे यांनी केली.

Solapur news
Travel Diaries : आहाहा! काय नजारा... आयुष्यात एकदा तरी हा उलटा धबधबा बघा, सहलीची मज्जा होईल डबल

या योजनेचे रहाटेवाडी येथील अर्धवट असून ठेकेदाराच्या माध्यमातून शासकीय कामात अडथळा आणून गुन्हा दाखल करण्याची धमकी अधिकाऱ्याकडून धमकी दिल्याची तक्रार केली. तर डोणज येथे 20 टक्के काम झाले असताना जास्तीचे रक्कम ठेकेदाराला अदा केल्याची तक्रार व चौकशीची मागणी दामाजीचे संचालक अशोक केदार यांनी केली.माजी पंचायत समिती सदस्य संजय पवार यांनी अधिकाऱ्यांनी या योजनेतील काम तालुक्यातील ठेकेदाराला मिळू नये याची खबरदारी घेऊन इतर ठिकाणच्या ठेकेदारांना अर्थपूर्ण व्यवहार काम दिल्याची तक्रार केली.

Solapur news
Mughal History : सलीमला तख्तावर बसवणाऱ्या मेहरुन्निसाची कथा, जी पुढे जाऊन मलिका-ए-हिंदुस्थान बनली

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सुदर्शन यादव यांनी केली तालुक्यातील या योजनेच्या सर्वच कामाची चौकशी करण्याची मागणी केली असता आ अवताडे यांनी तुर्त डोणज येथील कामाची चौकशी करून त्यावरून तालुक्यातील सर्वच कामाची चौकशी करू अशी आश्वासन दिले. आढावा बैठकीमध्ये असताना नागरिकाकडून समितीच्या मनरेगा योजनेचा आढावा घ्यावा अशी मागणीचा जोर धरण्यात आली त्यावेळी गटविकास अधिकाऱ्यांनी विहीरीसाठी आलेले अर्ज, मंजूर अर्ज, याची माहिती दिली परंतु उपस्थिताचे यात समाधान न झाल्यामुळे पंचायत समितीच्या कामाचा स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले.

Solapur news
Kidney Stone च्या रुग्णांनी चुकूनही खाऊ नये या 5 गोष्टी, वाढेल तुमचाच त्रास

एकूणच आजच्या आढावा बैठकीमध्ये नागरिकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती,पाणी प्रश्नावरून उपस्थित नागरिकांनी व आ. समाधान आवताडे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले, महावितरणचे सचिन कोळेकर यांनी 15 मिनिटात वीज पुरवठा सुरळीत करून पाणी सुरू करण्याचे आश्वासन दिले यावेळी नागरिकांनी बैठक संपेपर्यंत तरी पाणी सुरू करणार का ? असा प्रश्न उपस्थित करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com