Solapur Ganeshotsav : लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी सोलापूरकर सज्ज

आनंदोत्सवाला आजपासून प्रारंभ
solapur
solapur sakal

सोलापूर - शंख व कमळावर बसलेला, सिंहासनावर आरूढ, बालगणेश, शिवरूप धारण केलेला अशा गणरायांच्या विविध रूपांनी अवघा रंग एकच झाल्याची अनुभूती बाजारपेठेत येत आहे. उद्या (मंगळवारी) घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांच्या ठिकाणी बाप्पाचे आगमन होणार असून, बाजारपेठेत गणरायाच्या मूर्ती बुकिंगपासून ते सजावटीचे साहित्य, पूजा साहित्य खरेदी करण्यासाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी झाली आहे.

या आनंदोत्सवासाठी सोलापूरकरांनी तयारी पूर्ण केली असून, आता सर्वांना लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. सार्वजनिक मंडळांनी गणरायाच्या आगमनासाठी लेझीम, ढोल-ताशे, झांज पथके, टिपऱ्या आदी पारंपरिक वाद्यांची तयारी केली आहे.

दुष्काळ, महागाईवर मात करीत भक्तगणांकडून गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी मोठ्या उत्साहात होताना दिसून येत आहे. दरम्यान, नागरिकांना आता गणरायाचे आगमन आणि त्याच्या दहा दिवसांच्या पाहुणचाराचे वेध लागले असून, उत्सवाच्या कामाला गती आली आहे. या गणेशोत्सवाचा उत्साह बाजारपेठांमध्ये पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा चांगल्याच सजल्या आहेत.

solapur
Solapur News : रखडलेली कामे मार्गी लावा,गाव सोबत आणतो भाजप आमदाराला राष्ट्रवादीच्या नेत्याचे आव्हान

गणरायाच्या आगमनासाठी घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांचेही गणरायाच्या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. गणेशमूर्तीची नोंदणी आणि खरेदी; तसेच मखर, फुले, दिव्यांच्या माळा, दिवे, कागदी व कापडी तोरण, हार, पूजेचे व प्रसादाचे साहित्य अशा साहित्याची खरेदी मोठ्या उत्साहात सुरू आहे. महागाई आणि दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्येही नागरिकांच्या प्रतिसादामुळे व्यावसायिकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच उत्साह देणाऱ्या गणेशोत्सवाला उद्या (मंगळवार) पासून सुरवात होत असल्याने घराघरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

solapur
Solapur News : रखडलेली कामे मार्गी लावा,गाव सोबत आणतो भाजप आमदाराला राष्ट्रवादीच्या नेत्याचे आव्हान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com