solapur : लाइफ स्किल्स : यशस्वी होण्याचा मंत्र

मागील भागात लाइफ स्किल्सविषयी माहिती दिली आहे
Life Skills
Life SkillsSakal

लाइफ स्किल्स

मागील भागात लाइफ स्किल्सविषयी माहिती दिली आहे, आज जाणून घेऊयात लाइफ स्किल्सविषयी आणखी आधिक माहिती. ज्यास आपण बेसिक लाइफ स्किल्स म्हणूयात. ज्याचा नेमका स्वीकार आपण कसा करू शकू? आपल्या आयुष्यात नेमका कसा समावेश होऊ शकेल, याचा विचार करूयात.

Life Skills
MBBSला प्रवेश मिळत असताना शेतकरी पुत्राने निवडली वेगळी वाट आज IPS

आत्मभान: स्व-जागरूकता म्हणजे जाणीवपूर्वक स्वत:कडे लक्ष देणे. एखादा विषय हाताळताना आपण तो तसाच का हाताळतो आहोत याचं भान यायला हवं. यास चिंतन आणि आत्मपरीक्षण जरूरी वाटतं मला, जे करण्यास आपण वेळ देत नाही, त्यामुळे केलेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळणे बऱ्याच वेळा अवघड जाते. जेंव्हा आपल्याकडे हे लाइफ स्किल असतं, तेंव्हा आपण अनेकदा विचार करून झालेल्या चुका टाळू शकतो.

चिंतनशील विचार : कोणत्या गोष्टींवर विश्वास ठेवावा आणि कोणत्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नये, या विषयांसाठी हे कौशल्य लक्ष केंद्रित करण्यासाठी मदतगार ठरू शकतं. यामध्ये तथ्यं, कल्पनांचे विश्‍लेषण करणे, युक्तिवादाचे मूल्यांकन करणे समाविष्ट असू शकते. आपण योग्य निर्णय घेण्यासाठी शिस्तबद्ध विचारसरणी वापरतो आणि घेतलेल्या निर्णयांना अर्थ देणारी कृती करतो.

Life Skills
शहरात 3 तर ग्रामीणमध्ये 54 रुग्ण! निर्बंध उठविण्यासंदर्भात पालकमंत्री गप्प का?

निर्णयक्षमता : निर्णय घेणे म्हणजे पर्याय ओळखणे आणि निवडणे अशी व्याख्या केली जाऊ शकते. आपली निर्णय प्रक्रिया आपली मूल्ये, विश्वास, उद्दिष्टे इत्यादीवर अवलंबून असते. या लाइफ स्किलमध्ये समस्या निश्‍चित करणे, प्रभावी उपायांची आवश्‍यकता निश्‍चित करणे, निर्णयाची उद्दिष्टे स्थापित करणे आणि पर्याय ओळखणे यासारख्या कार्यांचा समावेश होतो. कधी कधी एखादा निर्णय न घेणे म्हणजेसुद्धा निर्णय असू शकतो, हे सुद्धा आपण ध्यानात घेतलं पाहिजे.

समस्या सोडविणे : ही एक विचार प्रक्रिया म्हणून परिभाषित केली जाऊ शकते. आपणास ज्ञात नसणारी समस्या सोडविताना कस लागतो. यासाठी ज्ञान, कौशल्यं आणि समज वापरून व्यक्ति समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतो, पण हे ध्यानात घ्यावं की समस्या सोडविणे म्हणजे संगणक प्रोग्रामिंगमध्ये अल्गॉरिथ्म लिहिण्यासारख नाही, इफ-देन विधान लिहून समस्या सोडविली जाऊ शकतं नाही.

Life Skills
Ukraine Crisis: सोलापूर जिल्ह्यातील 16 विद्यार्थी सुखरूप दिल्लीला पोहचले

प्रभावी संवाद : संवाद कौशल्य हे जीवनावश्‍यक कौशल्यामध्ये समाविष्ट होते. संवाद माध्यम कोणतंही असो हे कौशल्य आत्मसात असणं जास्त महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा योग्यप्रकारे संवाद साधला न गेल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागते असा अनुभव आहे. प्रभावी संवाद साधण्यात सक्षम असावे असे सर्वांनाच वाटते, कारण आपल्याला इतर मंडळींना काय संदेश द्यायचा आहे आणि आपल्याला काय सांगितले गेले आहे, हे समजून घ्यायचे असल्यास हे कौशल्य मदतगार सिद्ध होते. प्रभावी संवाद म्हणजे फक्त बोलणे नव्हे तर चांगले बोलणे आणि चांगले ऐकणे होय, या दोन्हींचा समावेश यात होतो. वैयक्तिक संवाद, सामाजिक संमेलन असोत, संवाद हा मुख्य घटक असतो. एखादा उमेदवार हुशार असतो पण नोकरीच्या ठिकाणी त्याची निवड ही त्याने दिलेल्या मुलाखतीच्या आधारावरच होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com