Solapur : घरबसल्या मिळणार विवाह नोंदणी प्रमाणपत्र

महापालिकेचे झोननिहाय केंद्र बंद; एकाच ठिकाणी होणार कामकाज
 marriages certificate
marriages certificateesakal

सोलापूर : महापालिकेने जन्म-मृत्यू विभागाप्रमाणे विवाह नोंदणी प्रमाणपत्राची ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे यापूर्वी महापालिकेच्या आठही झोनमध्ये असलेली विवाह नोंदणी केंद्रे बंद करून डफरीन येथे एक स्वतंत्र केंद्र उभारणार असल्याची माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

 marriages certificate
Solapur : "दगड फोडणाऱ्या हातातून सुबक तुळशी वृंदावन निर्मिती

शहरातील विवाह नोंदणी यापूर्वी ऑनलाइन पद्धतीने होत होती. परंतु, ही ऑनलाइन प्रणाली आणखी अद्ययावत करून नागरिकांची सोय करून दिली आहे. त्यासाठी राज्य शासनाकडूनच विवाह नोंदणीसाठी डीएमए सॉफ्टवेअर महापालिकेला उपलब्ध करून दिली आहे. या नव्या ॲपनुसार राज्यभरातून संबंधित महापालिकेला विवाह नोंदणीसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. महिन्याकाठी शहरातून साधारण २०० विवाह नोंदणी प्रमाणपत्र महापालिकेकडून दिले जातात. संबंधित झोन परिसरात झालेल्या विवाह नोंदणी केंद्रांमुळे महापालिकेच्या आठही झोनमध्ये स्वतंत्र विभागाची सोय होती. या कामकाजाकरिता प्रत्येक झोनला दोन याप्रमाणे १६ कर्मचारी नियुक्त होते.

 marriages certificate
Solapur Farmer : मोहोळ तालुक्यातील 43 हजार शेतकऱ्यांची दिवाळी गोड.

हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पती-पत्नी, नातेवाईक, साक्षीदार यांची कागदपत्रे झोनला सादर करावी लागत असत. महापालिका ही कागदपत्रे स्कॅन करून माहिती फॉर्म भरत. त्यानंतर प्रमाणपत्रासाठी कर्मचाऱ्यांच्या वेळेनुसार नागरिकांना हेलपाटे मारावे लागत. झोन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्व व्यक्ती प्रत्यक्षात हजर झाल्यानंतर ऑनलाइन विवाह नोंदणी फॉर्मची माहिती संगणकावर भरून प्रमाणपत्र दिले जात.

 marriages certificate
Solapur : "कर्जातील कारखाना चांगला चालवून दाखवू" - शिवानंद पाटील

या सर्व प्रकियेला विलंब लागत असे. त्यातच नागरिकांचा वेळ वाया जात असे. परगावच्या नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसत असत. या सर्व गोष्टींवर लगाम घालण्यासाठी नवी विवाह नोंदणी पद्धत प्रभावी ठरणार आहे. नागरिकांना वेळेवर आणि एकाच ठिकाणी विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळण्याबरोबरच आठ झोनला असलेल्या १६ कर्मचाऱ्यांऐवजी केवळ दोन कर्मचाऱ्यांवरच हे काम होणार असल्याने नागरिकांसह प्रशासनालाही फायदेशीर ठरणार आहे, असे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com