Solapur : करमाळा तालुक्यातील साखर कारखानदारी अडचणीत

बाहेरील साखर कारखान्यांना ऊस देण्यावर शेतकऱ्यांचा भर
Solapur news
Solapur newsesakal

करमाळा :करमाळा तालुक्यात साधारणपणे 25 लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त ऊस असूनही तालुक्यातील साखर कारखान्याना ऊस न देता तालुक्या बाहेरील साखर कारखान्याना ऊस देण्यावर शेतकरी भर देत आहेत.

Solapur news
Eye Care Tips : डोळ्यांचा चष्मा कमी करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टीप्स

सध्या करमाळा तालुक्यातील 80 टक्के ऊस तालुक्याबाहेरील पुणे,अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यातील माढा, माळशिरस तालुक्यातील कारखान्यांना जात आहे. विशेष म्हणजे करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल हा पवारांच्या बारामती ॲग्रो व अंबालिका शुगर या साखर कारखान्यांना ऊस देण्यावर असल्याचे दिसून येत आहेएकेकाळी करमाळा तालुक्यातील चारही कारखाने पूर्ण क्षमतेने चालत होते .सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक ऊसाचे क्षेत्र असलेल्या करमाळा तालुक्यातील साखर कारखाने ऊस असूनही पूर्ण क्षमतेने चालू शकत नाहीत

Solapur news
Geyser Precaution Tips : हिवाळ्यात गिझरची सर्व्हिसिंग गरजेची, अन्यथा होऊ शकते मोठी दुर्घटना

त्यामुळे करमाळा तालुक्यातील साखर कारखाने चालवण्याचे आव्हान कारखानदारांसमोर उभे राहिले आहे.एका बाजूला पाऊस कमी झाल्याने उसाचे उत्पादन घटले घटले आहे तर दुसरीकडे आज पर्यंत शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करण्यास या कारखानदारांना अपयश आल्याने शेतकरी तालुक्यातील साखर कारखान्यांवरती विश्वास न ठेवता बाहेरील साखर कारखान्यांना ऊस देत असल्याचे चित्र आहे.

Solapur news
Eye Care Tips : डोळ्यांचा चष्मा कमी करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टीप्स

अंबालिका शुगर,बारडगांव, ता.कर्जत,जि.नगर, बारामती ऑग्रो,शेटफळगढे, ता.इंदापूर जि.पुणे,गौरी शुगर हिरडगांव,ता.श्रीगोंदा, जिनगर, बारामती ऑग्रो, हळगांव,ता.जामखेड, जि.नगर ,विठ्ठल सह. पिंपळनेर, विठ्ठल कार्पोरेशन, म्हैसगाव या तालुक्याबाहेरी साखर कारखान्यांना ऊस देण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे.

Solapur news
Mens Health Tips : फिट्ट अंडरवेअर वापरणं जीवावर बेतू शकतं, अशी करा योग्य अंडरवेअरची निवड

तालुक्या बाहेर ऊस जाण्याला ऊसाला योग्य भाव न देणे हेच आहे. याशिवाय तालुक्यात अतिरिक्त ऊस असताना उसाचे राजकारण या कारखानदारांनी केले आहे. मागील हंगामात गाळप केलेल्या उसाला कमी भाव दिल्याचा व वेळेवर पैसे न दिल्याचा फटका विठ्ठल रिफाइंड शुगर ला बसत आहे.तर कमी भाव दिल्याचा फटका भैरवनाथ शुगर विहाळला बसत आहे.तर आजिनाथ सहकारी साखर कारखान्याने वाहतुकीसाठी स्वतःची यंत्रणा उभी न केल्याने या कारखाना सुरू करूनही गाळप करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

Solapur news
Hair Care Tips : कोरड्या आणि फ्रिझी केसांना मऊ बनवायचे आहे? मग, ‘या’ टीप्सची घ्या मदत

करमाळा तालुक्यात श्री आजिनाथ सहकारी साखर कारखाना शेलगाव -भाळवणी ,श्री मकाई सहकारी साखर कारखाना भिलारवाडी, हे दोन साखर कारखाने सहकार्य आहेत तर माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव विक्रम सिंह शिंदे अध्यक्ष असलेला विठ्ठल रिफाइंड शुगर ,पांडे व आरोग्यमंत्री प्रा तानाजी सावंत यांचा भैरवनाथ शुगर विहाळ हे चार साखर कारखाने आहेत.

Solapur news
Mental Health Tips : दिवसभरातील ताण-तणावानंतर स्वत:ला असे करा रिचार्ज, करा 'या' अ‍ॅक्टिव्हिटी

या चार साखर कारखान्यापैकी तीन साखर कारखाने सुरू आहेत तर मकाई सहकारी साखर कारखानाबंद आहे.तालुक्यातील विठ्ठल रिफाइंड शुगर, भैरवनाथ शुगर विहाळ या दोन कारखान्यांनी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात गाळप सुरू केली आहे.तर त्या पाठोपाठ आदिनाथ कारखान्याने गाळप सुरू केले आहे. या तीनही साखर कारखान्यांना ऊस देण्यासाठी शेतकरी उत्साही नसल्याचे चित्र आहे.

Solapur news
Kitchen Tips : लाटणं स्वच्छ करण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहितीय का?

ता 30 नोव्हेंबर पर्यंत विठ्ठल रिफाइंड शुगरने केवळ 45 हजार 269 मॅट्रिक टन उसाचे गाळप केले आहे.या कारखान्याकडून 2800 रुपये पहिला हप्ता जाहीर करण्यात आला असून दर पाच दिवसांनी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे पाठवले जात आहेत तरी देखील हा कारखाना पूर्ण क्षमतेने चालत नाही.तर दुसरीकडे विहाळ येथील भैरवनाथ शुगर हा साप या साखर कारखान्याने 58 हजार 660 मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून 2725 रुपये पहिला हप्ता जाहीर केला आहे.

Solapur news
Travel Tips: बाईक रायडिंगचा भन्नाट अनुभव घ्यायचाय? पाहा भारतातील सर्वोत्तम पर्याय

या दोन्हीही साखर कारखान्याची क्षमता 5 मेट्रीक टन प्रतिदिन आहे .मात्र कारखान्याला ऊस मिळत नसल्याने कारखाने पूर्ण क्षमतेने चालत नाहीत.नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात या दोन्हीही साखर कारखान्यांनी गाळप सुरू केली आहे .मात्र एक महिना होताला तरी हे दोन्हीही साखर कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत. तर मागील पंधरा दिवसांपूर्वी श्री आजिनाथ सहकारी साखर कारखाना सुरू झाला असून या साखर कारखान्याला पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

Solapur news
Parenting Tips: मुलांच्या रागावर असं मिळवा नियंत्रण, या आहेत सर्वात सोप्या टिप्स

करमाळा तालुक्यातील जास्तीत जास्त ऊस बारामती ॲग्रो व अंबालिका शुगर या दोन साखर कारखान्यांना जात असून अद्यापही या दोन्ही साखर कारखान्यांनी पहिला हप्ता जाहीर केला नाही तरी देखील शेतकऱ्यांचा कल या साखर कारखान्यांना ऊस घालण्यावर आहे तर दुसरीकडे तालुक्यातील साखर कारखान्यांनी उसासाठी पहिला हप्ता जाहीर करूनही त्यांना शेतकरी ऊस देण्यास तयार नाहीत.त्यामुळे तालुक्यात सुरू असलेले कारखाने किती दिवस चालतील हे पहावे लागेल.

करमाळा तालुक्यातील कारखानदार हे शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचे पैसे वेळेवर न देणे, इतर कारखान्याच्या तुलनेत भावना देणे.त्यामुळे शेतकऱ्यांचा तालुक्यातील कारखान्यावरती विश्वास राहिला नाही. म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा बाहेरील साखर कारखान्याला ऊस देण्यावर भर आहे .येणाऱ्या काळात तालुक्यातील कारखानदारी टिकण्यासाठी इतर कारखान्याच्या तुलनेने कारखान्यांना भाव द्यावा लागेल ज्यादा ऊस असताना देखील त्यांना शेतकऱ्यांना योग्य भाव देण्याची मानसिकता तालुक्यातील कारखानदारांनी ठेवणे गरजेचे आहे.

नवनाथ झोळ, संचालक करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती,करमाळा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com