Solapur :स्वेटर की रेनकोट; सोलापूरकरांत संभ्रम

रोगट वातावरणामुळे सर्दी, खोकल्याची भीती; सूर्यदर्शन दुर्लभ
Solapur news
Solapur newsesakal

सोलापूर : आकाशात दाटून आलेले ढग आणि थंडीचा कडाका असे एकाचवेळी विचित्र वातावरण सध्या सोलापूर शहर, जिल्ह्यात आहे. सकाळी काही ठिकाणी पावसाचे थेंबही पडले तर काही ठिकाणी केव्हाही पाऊस येईल असे वातावरण असल्याने नागरिकांना स्वेटर घालावे की रेनकोट असा प्रश्न पडला. दिवसभर सूर्यदर्शन न झाल्याने ढगाळ वातावरण होते.

Solapur news
Mental Health Tips : दिवसभरातील ताण-तणावानंतर स्वत:ला असे करा रिचार्ज, करा 'या' अ‍ॅक्टिव्हिटी

चक्रीवादळाचा परिणाम होऊन राज्यात निर्माण झालेल्या पावसाळी वातावरणाचा फटका कोरड्या हवामानाच्या सोलापूरलाही बसला. मागील दोन दिवसांपासून एकाच वेळी ढगाळ वातावरण व थंडी अशा विचित्र हवामानाला सोलापूरकरांना तोंड द्यावे लागत आहे. बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण तर गुरुवारी किंचित पावसासह दिवसभर ढगाळ वातावरणाबरोबरच बोचरी थंडीही पडल्याने सकाळी बाहेर फिरायला जाणाऱ्या नागरिकांची संख्या घटली. दुपारी तीन वाजेपर्यंत सूर्यदर्शनच न झाल्याने हवेत कमालीचा गारठा होता. हवामान खात्याच्या वेबसाइटवर रोगट हवामान दाखवत होते तर इतर जिल्ह्यात पावसाचा इशाराही देण्यात आला होता. या हवामानाचा द्राक्ष, कांदा, आंबा, ज्वारी मका या पिकांवर दुष्परिणाम होत आहे.

Solapur news
Career Tips : ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्यूवमध्ये यश मिळवण्यासाठी ‘या’ टिप्स करा फॉलो

रोगट हवेचा परिणाम

अतिसूक्ष्म घन व द्रव कण हे २.५ मायक्रोमीटर्सहून कमी व्यासाचे प्रदूषणकारी कण हवेत असतात. जे फुफ्फुसे आणि रक्त प्रवाहामध्ये प्रवेश करू शकतात. ज्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या होऊ शकतात. सर्वात गंभीर परिणाम फुफ्फुसे आणि हृदयावर होतात. संसर्गाच्या परिणामी खोकला आणि श्वास घेण्यात अडचण, वाढलेला दमा आणि जुनाट श्वसनाचे आजार बळावू शकतात.

सेालापूरचे हवामान

पर्जन्यवृष्टी : शून्य टक्के

आर्द्रता: ६५ टक्के

वारा : १४ किलोमीटर प्रती तास

हवामान : ढगाळ

कमाल तापमान : २५.५ अंश सेल्सिअस

किमान तापमान : १९.२ अंश सेल्सिअस

Solapur news
Parenting Tips : तुमची मुलं लग्नासाठी नकार देतायत? मग या गोष्टी कारणीभूत असू शकतात

हवामानात बदल झाल्याने थंडी व आर्द्रता वाढली आहे. यामुळे हवेतील पाण्याचे प्रमाण वाढते. हे बाष्पाचे कण नाकातोंडात जाऊन विविध प्रकारचे विषाणूजन्य रोग वाढतात. यासाठी मोटारसायकल व रिक्षामधून फिरताना नाका तोंडाला मास्क लावणे किंवा उपरण्याने नाक, तोंड, कान बांधणे आवश्यक आहे. या हवामानामुळे सर्दी, पडसे, खोकला, ताप आशा आजारांबरोबरच डेंगीसारख्या आजाराचे रुग्ण वाढू शकतात.

- डॉ. सुधीर देशमुख, अधिष्ठाता, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर

Solapur news
Vastu Tips : घरातील दागिन्यांची दिशा बदला, घरात सोन्या-नाण्याची कमी पडणार नाही

मागील चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. या वातावरणात द्राक्ष, कांदा, आंबा या पिकांवर वाईट परिणाम होतो. हरभरा पिकावर घाटे आळे पडते तर ज्वारी व मका या पिकांवर लष्करी आळीचा हल्ला होऊ शकतो. पानांवर, घडांवर पाणी साचल्याने द्राक्ष पिकाचे मणी तडकणे, मणी सडणे असे प्रकार घडतात. कांदाही सडू शकतो. पातीवर करपा या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो.

- डॉ. लालासाहेब तांबडे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र

हा सर्व चक्रीवादळाचा परिणाम आहे. चक्री वादळातील जे ढग पुढे सरकली आहेत ते महाराष्ट्रात जमा झाले आहेत. अजून किमान दोन दिवस अशी स्थिती राहील. त्यानंतरही काही दिवस वातावरण ढगाळच असेल ते किमान गुरुवारपर्यंत (ता.१४) राहील. राज्यात हवेचा दाब कमी आहे. हवेचा दाब वाढल्याशिवाय वातावरण बदलणार नाही. शुक्रवारपासून (ता.१५) हवेचा दाब वाढेल.

- डॉ. रामचंद्र साबळे, हवामान तज्ज्ञ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com