विद्यार्थ्यांची विज्ञान शाखेलाच पसंती! अकरावी प्रवेशाची पहिली मेरिट यादी ८० टक्क्यांवर क्लोज

सोलापूर शहरातील नामांकित महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशाची पहिली मेरिट यादी ७१ ते ९० टक्क्यांवर क्लोज झाली. पहिल्या यादीत ए. डी. जोशी महाविद्यालयात खुल्या प्रवर्गासाठी सर्वाधिक ९० टक्क्यांपर्यंत मेरिट होते.
अकरावी प्रवेश
अकरावी प्रवेशEsakal

सोलापूर : शहरातील नामांकित महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशाची पहिली मेरिट यादी ७१ ते ९० टक्क्यांवर क्लोज झाली. पहिल्या यादीत ए. डी. जोशी महाविद्यालयात खुल्या प्रवर्गासाठी सर्वाधिक ९० टक्क्यांपर्यंत मेरिट होते.

दहावी निकालानंतर आता अकरावी प्रवेशाची लगबग सुरु आहे. जिल्ह्यातील विशेषतः: शहरातील बहुतेक विद्यार्थ्यांचा कल संगमेश्वर महाविद्यालय, ए. डी. जोशी महाविद्यालय, दयानंद, वालचंद, डी. ए. व्ही. वेलणकर, हिराचंद नेमचंद महाविद्यालय या महाविद्यालयांकडेच असतो. अनेक तालुक्यातील नामांकित कनिष्ठ महाविद्यालयांनी यापूर्वीच त्यांचे प्रवेश अंतिम टप्प्यात आणले आहेत. काही महाविद्यालयांनी स्पॉट ॲडमिशन देखील दिले आहेत.

आता ८० किंवा ८४ टक्के गुण असलेला विद्यार्थी जरी आला, तरी त्याला विनाअनुदानित शाखेला प्रवेश घेण्याची अट घातली जात असल्याचीही उदाहरणे आहेत. दरम्यान, सोलापूर शहरातील नामांकित महाविद्यालयांमधील मागासवर्गीय प्रवर्गाचे मेरिट यंदा खूपच खाली आल्याची स्थिती आहे.

कोणत्या महाविद्यालयाचे किती मेरिट

  • (डी. बी. एफ दयानंद महाविद्यालय)

  • खुला प्रवर्ग : ८८ टक्के

  • इतर प्रवर्ग : ७२.८० ते ८७.२० टक्के

  • ------

  • (संगमेश्वर महाविद्यालय)

  • खुला प्रवर्ग : ८८ टक्के

  • इतर प्रवर्ग : ६७.८० ते ८०.६० टक्के

------

  • (ए. डी. जोशी महाविद्यालय)

  • खुला प्रवर्ग : ९० टक्के

  • अन्य प्रवर्ग : ५५.८० ते ८१.४० टक्के

-----

  • (हिराचंद नेमचंद कॉमर्स महाविद्यालय)

  • अनुदानित : ७७.८० टक्के

  • विनाअनुदानित : ७९.४० टक्के

----

  • (वालचंद कॉलेज)

  • अनुदानित : ८७ टक्के

  • विनाअनुदानित : ८१.६० टक्के

----

  • (डी. ए. व्ही. वेलणकर कॉलेज)

  • खुला प्रवर्ग : ७१ टक्के

  • इतर प्रवर्ग : ४२.८० ते ६९.८० टक्के

कला शाखेला ४८ ते ४० टक्क्यांचे विद्यार्थी

जिल्ह्यात कला शाखेच्या १७ हजार (प्रवेश क्षमता) जागा असून वाणिज्य शाखेच्या २३ हजार ५०० जागा आहेत. पण, शहर असो वा ग्रामीण भागातील बहुतेक म्हणजेच ६५ टक्क्यांवरील विद्यार्थ्याचा कल विज्ञान शाखेकडेच असल्याची सद्य:स्थिती आहे. त्यामुळे कला व वाणिज्य शाखेचे प्रवेश पूर्ण करण्यासाठी शिक्षकांची दमछाक होऊ लागली आहे. आता प्रवेशाच्या अंतिम यादीनंतर पाहिजे त्या शाखेला प्रवेश न मिळालेले विद्यार्थी कला शाखेला किंवा आयटीआयला प्रवेश घेतात, हा दरवर्षीचा अनुभव आहे. आता विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश यादीची प्रतीक्षा असून याच आठवड्यात दुसरी यादी प्रसिद्ध होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com