
सोलापूर : भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याला ऊस तोडून पुरवठा करण्यासंदर्भात करारपत्र करून पाच जणांनी एक कोटी दोन लाख रुपये घेतले. त्यानंतर त्यांनी कराराप्रमाणे काहीच न करता फसवणूक केल्याची फिर्याद कारखान्याचे शेती अधिकारी प्रतापराव रंगराव थोरात यांनी पंढरपूर ग्रामीण पोलिसांत दिली. त्यावरुन पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिस गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे संकलित करीत आहेत.