यंदाचा युवा महोत्सव सप्टेंबरमध्ये! पंढरपूर येथील ‘स्वेरी’ महाविद्यालयात रंगणार 4 दिवस महोत्सव

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने दरवर्षी विद्यापीठातर्फे युवा महोत्सव आयोजित केला जातो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा युवा महोत्सव सप्टेंबरमध्ये पंढरपूरच्या स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयात होणार आहे.
solapur univercity
solapur univercitysakal

सोलापूर : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने दरवर्षी विद्यापीठातर्फे युवा महोत्सव आयोजित केला जातो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा युवा महोत्सव सप्टेंबरमध्ये पंढरपूरच्या स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयात होणार आहे.

संगीत, कला, नाट्य, ललित कला व वाड;मय याअंतर्गत एकूण २७ कलाप्रकाराचे सादरीकरण युवा महोत्सवात केले जाते. गतवर्षी कथाकथन, काव्यवाचन विद्यार्थ्यांमधील सुप्तगुणांना व सजृनशिलतेला वाव मिळावा हा त्यामागील हेतू असतो.

यंदाच्या युवा महोत्सवाचे यजमानपद डॉ. बी. पी. रोंगे यांच्या स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयाने स्वीकारले आहे. त्याठिकाणी चार दिवस हा युवा महोत्सव रंगणार आहे. या महोत्सवासाठी विद्यापीठाकडून यजमान महाविद्यालयास १२ लाख रुपये दिले जातात. त्यातून स्पर्धक विद्यार्थ्यांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. सध्या महोत्सवाच्या अनुषंगाने विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांनी तयारी सुरु केली आहे.

यंदा महोत्सवातील कलाप्रकार वाढणार

राजभवनातर्फे आयोजित इंद्रधनुष्य व अखिल भारतीय पश्चिम विभागीय व राष्ट्रीय युवा महोत्सवात (एआययु) समाविष्ट असलेल्या कला प्रकारांचाही विद्यापीठाच्या युवा महोत्सवात समाविष्ट करण्याचा प्रयत्न सुरु आहे. जेणेकरून भविष्यात राज्य, राष्ट्रीय स्तरावर आपल्या विद्यार्थ्यांना त्याठिकाणी सहभागी होऊन प्रथम क्रमांक पटकावणे सोयीचे होईल, हा त्यामागील हेतू आहे. कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या अंतिम मान्यतेनंतर कोणते कलाप्रकार वाढतील, हे निश्चित होणार आहे.

चार दिवस चालणार महोत्सव

विद्यार्थ्यांसह महाविद्यालयांच्या सोयीनुसार युवा महोत्सवाची तारीख अंतिम केली जाणार आहे. सप्टेंबरच्या मध्यावधीत हा महोत्सव सुरु करण्याचे नियोजन सुरु असून महोत्सव चार दिवस चालणार आहे. स्वेरी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या स्वागताची व महोत्सवाच्या नियोजनाला सुरवात केली आहे. जास्तीत जास्त महाविद्यालयांनी या महोत्सवात सहभागी व्हावे, जेणेकरून त्यांच्या विद्यार्थ्यांना कलागुण सादर करण्याची संधी मिळेल, असे आवाहन कुलगुरूंनी केले आहे.

सर्व संलग्नित महाविद्यालयांनी घ्यावा सहभाग

यंदाचा युवा महोत्सव पंढरपूर येथील स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयात होणार आहे. त्यादृष्टिने विद्यापीठाशी संलग्नित सर्वच महाविद्यालयांनी तयारी करावी आणि विद्यार्थ्यांना महोत्सवात पाठवावे.

- डॉ. राजनीश कामत, प्रभारी कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

विद्यापीठाच्या महोत्सवाची स्थिती

  • महोत्सवाचा निधी

  • १२ लाख

  • संलग्नित महाविद्यालये

  • १०९

  • युवा महोत्सवाचा कालावधी

  • ४ दिवस

  • महोत्सवातील कलाप्रकार

  • २७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com