सीताफळाच्या गोल्डन वाणामुळे हजारो शेतकरी लखपती

डॉ. नवनाथ कसपटे यांची किमया; एनएमके-१ वाणाला देशभरातून मागणी
सीताफळ फळझाड. 
सीताफळ फळझाड. sakal

बार्शी : मराठवाड्याचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्या बार्शीची ओळख आता सिताफळाचे क्‍लस्टर’ आणि सीताफळाची बार्शी’ म्हणून होत आहे, याचे सारे श्रेय जाते सीताफळाच्या एनएमके - १ (गोल्डन) वाणाचे जनक डॉ. नवनाथ मल्हारी कसपटे यांना. बांधावरच्या उपेक्षित फळझाडाला फळबागेच्या रांगेत बसवून खऱ्या अर्थान न्याय मिळवून दिला असून राज्य-परराज्यातील हजारो शेतकरी लखपती आणि करोडपती झाले आहेत.सीताफळाच्या अनुशांगाने देश व जगभरातून गोरमाळे (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथे येणाऱ्या शेतकरी, व्यापारी आणि उद्योजक यांची संख्या गेल्या काही वर्षात वाढत आहे. दररोज किमान शंभरच्यावर पर्यटक मधुबन फार्मला भेट देवून भारावून जातात. यावर्षी सर्व फळांच्या दराचे रेकॉर्ड मोडत एनएमके-१ (गोल्डन) वाणाच्या सीताफळांना ठोक मार्केटमध्ये प्रतिकिलो २८० रुपये दर मिळविला. हा दर प्रत्यक्षात शेतकऱ्याला मिळाला असून किरकोळ बाजारात याहीपेक्षा उच्चांकी दर होता. त्यामुळे सर्वात महाग विकले जाणारे फळ म्हणून याची ओळख झाली आहे.

सीताफळ फळझाड. 
बार्शी वकील संघाची निवडणूक जाहीर

सीताफळाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिले पेटेंट

गेल्या काही वर्षात देशभरात एनएमके-१ (गोल्डन) वाणाच्या सिताफळाची लागवड वाढत आहे. या वाणाला आता अंतरराष्ट्रीय स्तरावरील पेटेंटही मिळाले आहे. विशेष म्हणजे सीताफळाला मिळालेले हे जगातील पहिले पेटेंट आहे.

प्रशिक्षणाची सुसज्ज व्यवस्था

पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता येथे एकत्र लोक असल्यानंतर लागलीच त्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था कोणत्याही क्षणी येथे होते. प्रत्येक महिन्याला दोनशे प्रशिक्षणार्थींना सिताफळाच्या लागवडीपासून काढणी व विक्री व्यवस्थापनापर्यंतचे प्रशिक्षण दिले जाते.

दुभाषीकांची सोय

मधुबन फार्मवर येणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये दक्षिण भारतातील शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यांना सिताफळ लागवडीची माहिती त्यांच्या स्थानिक भाषेत सांगण्यासाठी दुभाषीकाची व्यवस्था करण्यात आली आहे. तेलगु, कन्नड, तमीळ, हिंदी व इंग्रजी या भाषेतील दुभाषीक फार्मवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

सीताफळ फळझाड. 
पुणे पदवीधर मतदार संघाची निवडणूक होणार तिहेरी

अनेक पुरस्कारांचा वर्षाव

डॉ. कसपटे यांच्या कामाचा राज्यातील विविध संस्थांनी पुरस्कार देवून गौरव केला आहे. २०१७ मध्ये भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरणातर्फे दिला जाणारा प्लॅंट जिनोम सेवियार फार्मर ॲवार्ड २०१५ मिळाला आहे, अशा प्रकारचे लहान-मोठे विविध १७ पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

बेंगलुरू विद्यापठाकडून मानद डॉक्‍टरेट पदवी

डॉ. कसपटे यांच्या सिताफळातील कामामुळे बेंगलुरू विद्यापीठाकडून २०१८ मध्ये चेन्नई येथे मानद डॉक्‍टरेट पदवी बहाल करण्यात आली आहे. इयत्ता अकरावी शिकलेला शेतकरी डॉ. कसपटे‘सीताफळातील डॉक्‍टर’ म्हणून युवा शेतकऱ्यांसमोर आदर्श ठरला आहे.

४२ वाणांचे संकलन

डॉ. नवनाथ कसपटे यांनी १९८५ सालापासून सीताफळाचे विविध वाण संकलन करण्यास सुरूवात केली. त्यांच्याकडे ४२ वाणाची प्रत्यक्ष लागवड असून २००२ मध्ये हा प्रात्यक्षिक प्लॉट तयार करण्यात आला आहे. यापैकी २२ वाणाच्या फळाचे त्यांनी पृथकरण केले. सुमारे २५०० रोपांची नऊ एकर क्षेत्रावर लागवड केली आहे.

अखिल महाराष्ट्र सीताफळ उत्पादक प्रशिक्षण व संशोधन संघाची २००३ मध्ये स्थापना केली. बारा वर्षाच्या अध्यक्षपदाच्या काळात सीताफळाच्या मुल्यवर्धनासाठी राज्यातील ११०० हून जास्त सीताफळ उत्पादकांना संघाच्या छत्राखाली एकत्र आणले. राज्यातील विविध भागात बारा राज्यव्यापी अनेक विभागीय कार्यशाळा आणि सीताफळ परिषदेचे आयोजनही केले. महाराष्ट्रासह इतर राज्यात सीताफळाचा विस्तार होत असल्याचे लक्षात आल्याने अखिल भारतीय सीताफळ महासंघाची स्थापना केली.

- डॉ. नवनाथ कसपटे, सीताफळ उद्योजक, गोरमाळे, ता. बार्शी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com