

Food Adulterators Face Major Blow as FDA Seizes ₹4.31 Crore Worth of Illegal Food Products
sakal
सोलापूर : राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर अवघ्या एका महिन्यात सोलापूर जिल्ह्यात धडक कारवाईचा सपाटा सुरू झाला आहे. २५ मे ते २५ जून या कालावधीत अन्न व औषध प्रशासनाने तब्बल ४ कोटी ३१ लाख रुपयांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित व संशयित अन्नसाठा जप्त केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गुटखा, पानमसाला आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या अवैध व्यवसायाला मोठा धक्का बसला आहे.