सोलापूर बार असोसिएशनसाठी कोणाचे पारडे जड? 1831 वकिल करणार आज मतदान; ॲड. उजळंबे, ॲड. आळंगे अन्‌ ॲड. फताटे यांच्यात तिरंगी लढत

सोलापूर बार असोसिएशनसाठी सोमवारी मतदान होत आहे. सकाळी आठ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीत एस. व्ही. उजळंबे, ॲड. अमित आळंगे आणि ॲड. राजेंद्र फताटे यांच्यात अध्यक्षपदासाठी चूरस पहायला मिळणार आहे.
advocate
advocatesolapur

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील वकील संघाची अत्यंत प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या सोलापूर बार असोसिएशनसाठी उद्या (सोमवारी) मतदान होणार आहे. सकाळी आठ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीत एस. व्ही. उजळंबे, ॲड. अमित आळंगे आणि ॲड. राजेंद्र फताटे यांच्यात अध्यक्षपदासाठी चूरस पहायला मिळणार आहे.

सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक नेमकी लोकसभा निवडणुकीच्या प्रचार काळात होत आहे. निवडणुकीची संपूर्ण तयारी झाली असून सोमवारी मतदान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या सभा सोमवारीच सोलापुरात होत आहेत. या पार्श्वभूमीवर मतदानाची वेळ वाढविण्यात आली आहे.

मतदानानंतर ३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीत तिरंगी लढत होत असल्याने सोलापूर बार असोसिएशनचा नूतन अध्यक्ष कोण, यासंदर्भात तर्कविर्तक लढविले जात आहेत. यंदाच्या बार असोसिएशनच्या निवडणुकीत वकिलांनी ईव्हीएमचा वापर करावा, अशी मागणी केली होती. मात्र, बॅलेट पेपर हेच विश्वासार्ह माध्यम असल्याचे सांगत वकील संघाची निवडणूक बॅलेट पेपरद्वारेच होईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. सुरेश गायकवाड व बार आसोसिएशनच्या कार्यकारी मंडळाने घेतला आहे.

ठळक बाबी...

  • एकूण मतदार वकिल : १,८३१

  • एकूण उमेदवार : १९

  • मतदानाला सुरवात : सकाळी ८

  • मतदान किती वाजेपर्यंत : सायंकाळी ७

  • मतमोजणी : ३ मे रोजी

पॅनलनिहाय वकिल उमेदवार

१) परिवर्तन पॅनल

  • अध्यक्षपदासाठी : राजेंद्र फताटे

  • उपाध्यक्षपदासाठी : परवेज ढालायत

  • सचिवपदासाठी : शामराव बिराजदार

  • सहसचिवपदासाठी : सुवर्णा शिंदे

  • खजिनदारपदासाठी : प्रकाश अभंगे

--------------------------------------------------------------

२) विधी सेवा पॅनल

  • अध्यक्षपदासाठी : अमित आळंगे

  • उपाध्यक्षपदासाठी : जयप्रकाश भंडारे

  • सचिवपदासाठी : लक्ष्मण पाटील

  • सहसचिवपदासाठी : निदा सैफन

  • खजिनदारपदासाठी : विनयकुमार कटारे

--------------------------------------------------------------

३) विधी व्यासपीठ पॅनल

  • अध्यक्षपदासाठी : एस. व्ही. उजळंबे

  • उपाध्यक्षपदासाठी : व्ही. पी. शिंदे

  • सचिवपदासाठी : मनोज पामूल

  • सहसचिवपदासाठी : मीरा प्रसाद

  • खजिनदारपदासाठी : अब्दुल शेख

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com