सैन्य दलातील जवानांसाठी आपुलकीचा गाेडवा

प्रशांत गुजर
Wednesday, 15 January 2020

आज (बुधवार) देशभरात मकर संक्रांत उत्साहात साजरी हाेत आहे. तिळगूळ घ्या गाेड बाेले असे म्हणत नागरीक एकमेकांना शुभेच्छा देताहेत. सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी भारतीय सैन्य दलातील जवानांना तिळगूळ पाठविले आहेत. देशाच्या जवांनाप्रती आदर व्यक्त करत राबवलेल्या या उपक्रमशील विद्यार्थ्यांचे अनेकांनी कौतुक केले.

सायगाव (जि. सातारा) : देशाचे रक्षण करणाऱ्या सीमेवरील जवान बांधवांना आपले सण साजरे करता यावेत, या हेतूने शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत तिळगूळ व भेटकार्डे पाठवली. देशाच्या जवांनाप्रती आदर व्यक्त करत राबवलेल्या या उपक्रमशील विद्यार्थ्यांचे अनेकांनी कौतुक केले.

जरुर वाचा - पैलवान असाच घडत न्हाय..!
 
गुळुंब हायस्कूल व जयहिंद फाउंडेशन यांच्या वतीने मुख्याध्यापिका मनीषा धेडे-अरबुने व जयहिंद फाउंडेशनचे सचिव हनुमंत मांढरे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थी व विद्यार्थिनींना आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना संक्रांत सण सीमेवर साजरा करता यावा, या हेतूने तिळगूळ व तयार केलेले शुभेच्छापत्र व अनेक देशसेवेचे संदेश तयार करून सीमेवर पाठविण्यात आले. या वेळी शाळेतील सर्व मुलांमध्ये आपल्या जवानांसाठी ही भेटकार्डे तयार करताना आपल्या देशाप्रती असणारी भावना, प्रेम दिसून आले.

नक्की वाचा - शिवरायांशी तुलना झाल्यानंतर यशवंतराव म्हणाले हाेते...

यावेळी खऱ्या अर्थाने हा आगळा वेगळा उपक्रम राबविताना सर्व विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले होते. या उपक्रमाचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे. यावेळी चंद्रकांत पाटील, शिवाजी गार्डे, संजय गायकवाड, विकास चव्हाण, अशोक खाडे, प्रदीप वाघ, जयंती गायकवाड, प्रवीण चव्हाण, राजेंद्र पारखे या शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले. 

जरुर वाचा - प्रेमविवाह करताय... केलाय... हे वाचाच

भावी पिढीमध्ये देशाचे रक्षण करणाऱ्या या जवानांप्रती आदर निर्माण व्हावा, या हेतूने हा उपक्रम राबवला. मुलांमध्ये देशभावना जागृत व्हावी, या उद्देशाने केलेले काम आदर्श आहे. त्यांचा आदर्श सर्व शाळांनी घ्यावा.
- प्रताप यादव, संचालक, यशवंत शिक्षण संस्था, वीरबाग 

हेही वाचा - #KheloIndia महाराष्ट्राच्या सुदेष्णा शिवणकरच्या संघर्षाला यश
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students From Satara Sent Tilgul To Indian Army Soliders On Occassion Of Makarsankranti