esakal | #KheloIndia महाराष्ट्राच्या सुदेष्णा शिवणकरच्या संघर्षाला यश
sakal

बोलून बातमी शोधा

#KheloIndia महाराष्ट्राच्या सुदेष्णा शिवणकरच्या संघर्षाला यश

सुदेष्णा शिवणकर हि सातारा जिल्ह्यातील अव्वल खेळाडू आहे. तिला खेळासाठी पालकांचे पाठबळ सातत्याने असते. तिच्या बरोबर तिचे वडील हणमंतराव यांना पळताना (सरावात) निर्माण झालेल्या टाचेच्या दुखण्याशी आणि आर्थिक समस्येशी झुंजताना पाहिले की त्यांच्या संघर्षांला सलमा करावा वाटतो असे त्यांच्या साेसायटीमधील रहिवाशांची भावना आहे.

#KheloIndia महाराष्ट्राच्या सुदेष्णा शिवणकरच्या संघर्षाला यश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : गुवाहटी (आसाम) येथे सुरु असलेल्या तिसऱ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुदेष्णा हणमंत शिवणकर हिने 200 मीटर धावणेत कास्यपदक मिळविले. यंदाच्या स्पर्धेतील सुदेष्णाचे हे दूसरे पदक आहे.

आज (मंगळवार) 17 वर्षाखालील मुलींच्या गटातील 200 मीटर धावणेच्या स्पर्धेत तेलंगणाच्या जीवनजी दिप्ती (24ः84) , दिल्लीच्या पायल व्हाेरा (24ः87) आणि महाराष्ट्र सुदेष्णा शिवणकर (25 : 24) इतकी वेळ नाेंदवून सुवर्ण, राैप्य तसेच कास्यपदक मिळविले. सुदेष्णा बराेबरच महाराष्ट्राच्या श्रेया शेडगे (25 : 32), रिया पाटील (25 : 75) यांनी उत्तम कामगिरी केली.

हेही वाचा -  सुदेष्णा शिवणकरने गाजविला दिवस

सुदेष्णा सातारामधील यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयूट आॅफ सायन्स काॅलेजची खेळाडू आहे. साेमवारी (ता. 13) या स्पर्धेत महाराष्ट्रच्या मुलींनी चार मीटर रिले स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. त्यामध्ये सुदेष्णाचा समावेश हाेता. 

सातारा एक्सप्रेस सुदेष्णा शिवणकर विषयी...

सुदेष्णा हणमंतराव शिवणकर आमच्या रामराव पवार नगर एकता सोसायटीचा अभिमान आहे. तिने खेलो इंडियाच्या गतवर्षीच्या स्पर्धेत 100 मीटर आणि रिले स्पर्धेत दोन सुवर्ण पदके मिळवून साताऱ्याच्या खेल जगतात नवा इतिहास निर्माण केल्याची भावना तिच्या साेसायटीमधील प्रत्येकास आहे. आजही तिने मिळविलेले यश सर्वांचा काैतुकाचा विषय ठरला आहे.

जरुर वाचा -  पैलवान असाच घडत न्हाय..!

सुदेष्णा एक हरहुन्नरी मेहनती,अष्टपैलू आणि सातत्यपूर्ण कष्ट घेणारी खेळाडू आहे. खेळ असाे अथवा सांस्कृतिक कार्यक्रम असाे ती सर्वात पुढे असते. ती जिद्दी खेळाडू आहे असे तेथील रहिवासी सांगतात. 

तिचा आणि तिच्या आई वडिलांचा संघर्ष आम्ही जवळून पाहत आहोत. पोलिस दलातील एक कर्मचारी या आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू निर्माण करण्याचा प्रयत्न करताना आर्थिक आघाडीवर केवढा मोठा संघर्ष करत आहे ते ही आम्ही पाहतोय. तिचे वडील हणमंतराव शिवणकर एक स्वाभिमानी माणूस आहे. घरदार विकेन पण देशाला सुदेष्णाकडून ऑलंपिकचे सुवर्णपदक मिळून देईन ही जिद्द आज ही त्यांनी बाळगली आहे. वेळ, काळ आणि वयाचा विचार न करता ते सुदेष्नाबरोबर अहोरात्र झटतात. 

सुदेष्णाची कामगिरी...

गतवर्षी झालेल्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत धावण्यामध्ये सुवर्णपदकांची लयलूट करणारी सातारा एक्सप्रेस सुदेष्णा हणमंत शिवणकरने पदके पटकावण्याची घोडदौड सुरुच ठेवली आहे. 

डेरवण (जि. रत्नागिरी) येथे झालेल्या 35 व्या महाराष्ट्र राज्य ज्युनियर ऍथलेटिक चँपियनशीप 2019 स्पर्धेत तिने सिल्व्हर पदके पटकावल्यानंतर तिची निवड राजस्थान (अलवर) येथील होणाऱया 35 व्या भारत वेस्ट झोन ज्युनियर ऍथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी झाली होती. या स्पर्धेत सुदेष्णा हिने 100 व 200 मीटर आणि मिडले रिले धावणे या तिन्ही क्रिडा स्पर्धामध्ये तीन सुवर्णपदक पटकावत उत्तुंग कामगिरी केली आहे.

नक्की वाचा -  #KheloIndia : सुदेष्णा,पार्थसह आता स्नेहाची दमदार कामगिरी
 
सुदेष्णा शिवणकर ही साताऱयातील यशवंतराव चव्हाण सायन्स महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून पोलीस दलातील हणमंत शिवणकर यांची ती कन्या आहे. आपल्या वडिलांच्या प्रोत्साहन व तालुका क्रीडा अधिकारी बळवंत बाबर व सायन्स कॉलेजमधील प्रशिक्षक कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली तिने पदके पटकावण्याची यशस्वी वाटचाल कायम ठेवली आहे.
 
सुदेष्णाच्या खेळातील कामगिरीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत असून या पोलीस कन्येवर साताऱयातील क्रीडा क्षेत्रासह मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

हेही वाचा -  शिवरायांशी तुलना झाल्यानंतर यशवंतराव म्हणाले हाेते...