शिवरायांशी तुलना झाल्यानंतर यशवंतराव म्हणाले हाेते...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 January 2020

भाजपचे प्रकरण अंगलट आल्याने शरद पवारांना जनतेने दिलेली "जाणता राजा' पदवी मागे घेण्याची मागणी भाजपकडून हाेत आहे. हे हास्यास्पद असल्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी नमूद केले.
 

सातारा : यशवंतराव चव्हाण यांची तुलना आचार्य अत्रेंनी छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर केली होती. मात्र, यशवंतराव चव्हाण यांनी माझी तुलना छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर करू नका. त्यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व जगात होऊ शकलेले नाही, असे सांगितले होते; पण, आज तशी परिस्थिती दिसत नसल्याने ते पुस्तक भाजपच्या अंगलट आले आहे, अशी टीका सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली.

नक्की वाचा - ...म्हणून हाेतेय सातारकरांच्यात पून्हा श्रीनिवास पाटलांची चर्चा

नियोजन समितीच्या आढावा बैठकीनंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. आज के शिवाजी नरेंद्र मोदी या भाजपच्या एका नेत्याने प्रकाशित केलेल्या वादग्रस्त पुस्तकावर राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका काय? तसेच राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला जाणता राजा ही दिलेली पदवी मागे घ्यावी, अशी मागणी भाजपकडून होत आहे त्याबाबत आपले मत काय? यावर बोलताना मंत्री पाटील म्हणाले, ""जितेंद्र आव्हाड यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.''

हेही वाचा -  खासदार सुप्रिया सुळेंची उदयनराजेंवर खाेचक टीका

विधानसभा निवडणुकीत कऱ्हाड उत्तर मतदारसंघात साताऱ्याच्या दोन्ही राजांनी तुम्हाला मदत केली का? या प्रश्‍नावर त्यांनी मला जनतेने मदत केल्याचे सांगितले. वनविभागाकडून वृक्षारोपणाचे कार्यक्रम राबवले जातात. मात्र, झाडे कुठेच दिसत नाहीत. जलसंधारणाच्या कामांची नेमकी काय माहिती आपण घेतली. यावर पाटील म्हणाले, ""शासनाकडून दर वर्षी वृक्षारोपणाचे उद्दिष्ट दिले जाते. मात्र, ही झाडे किती लावली आणि किती जगली याची माहिती घेतली जाईल. जलसंधारणाच्या कामाचीही चौकशी केली जाईल.''

जरुर वाचा - Video : माेदींच्या पुस्तकाविषयी उदयनराजे म्हणाले...

कास पठारावरील अतिक्रमणे, तसेच सातारा शहरातील ओढ्यांवरील बेकायदा बांधकामांवर तत्कालीन पालकमंत्र्यांनी कारवाई केली नाही. त्यांच्या भूमिकेबाबत विचारले असता मंत्री पाटील म्हणाले, ""यामध्येही आपण लक्ष घालू व माहिती घेऊन कारवाई करू.

हेही वाचा - पाचगणीच्या दरीतून असा काढला मुंबईच्या महिलेचा मृतदेह


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yashwantrao Chavan Said Do Not Compare Me With Shivaji Maharaj