गेली 23 वर्षे दुर्गम भागातील विध्यार्थ्यांसाठी धडपडतोय 'हा' अवलिया

success story teacher uday athani belgaum
success story teacher uday athani belgaum

बेळगाव : आज काल सरकारी नोकरी मिळताच शहरात नोकरीची संधी मिळावी यासाठी प्रत्येकाची धडपड असते. मात्र नोकरी लागल्यापासून गेली 23 वर्षे दुर्गम भागातील विध्यार्थ्यांना शिकविण्यासाठी एक अवलिया शिक्षक धडपडत असून विद्यार्थी प्रिय असणाऱ्या या शिक्षकांच्या कार्याची सर्वानी दखल घेणे आवश्यक बनले आहे. 


जांबोटी ता खानापूर येथील विजयनगर (गवळी वाडा) या गावातील सरकारी मराठी शाळेत कार्यरत असणाऱ्या उदय रामचंद्र अथणी यांनी गेली 23 वर्षे दुर्गम भागातील शाळांमध्ये काम करण्यास प्राधान्य दिले आहे. अथणी यांचे मुळ गाव बेळगाव तालुक्यातील मारिहाळ आहे. मात्र त्यांनी नोकरी लागल्यानंतर आपल्या गावाकडे किंवा शहरी भागात बदली व्हावी यासाठी प्रयत्न न करता दुर्गम भागातील विध्यार्थ्यांना शिकविण्यासाठी ते कार्यरत आहेत. अथणी यांनी आपल्या शैक्षणिक क्षेत्राची सुरवात बेटने येथील सरकारी मराठी शाळेपासून केली त्या ठिकाणी त्यांनी 10 वर्षे सेवा बजावली त्यानंतर ओलमणी, तळवडे, चौर्ला येथे नोकरी केल्यानंतर 7 वर्षांपासून ते विजयनगर येथे सेवा बजावीत आहेत. 


दुर्गम भागातील शाळेत नोकरी करीत असताना त्यांनी त्याच भागात राहण्याचा निर्णय घेत जांबोटी येथे घर बांधले आहे. या ठिकाणी ते आपल्या कुटुंबासह राहतात दुर्गम भागातील विध्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत मोठी आवड असते. त्यामुळे त्यांना चांगल्या प्रकारे शिकविल्यास त्यांची चांगली शैक्षणिक प्रगती होऊ शकते त्यामुळे अथणी हे विद्यार्थ्यांसाठी शाळेत विविध प्रकारचे उपक्रम राबवित असतात. तसेच विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. 

अथणी हे सध्या नोकरी करीत असलेले विजयनगर या गावात गवळी लोक राहतात. त्यामुळे त्यांचा आर्थिक स्तर सुधारावा यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असून अनेक शिक्षक शहरापासून जवळ असलेल्या किंवा शहरात बदली करून घेण्यासाठी प्रयत्नशील असतात मात्र दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी अथणी यांची धडपड सर्वांसाठी आदर्श आहे. सर्वच शिक्षकांनी अथणी यांच्या प्रमाणे कार्य केल्यास दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यास मदत मिळणार आहे.

 सुरवातीपासूनच दुर्गम भागातील शाळांत नोकरी करण्याची संधी मिळाली त्याबाबत समाधानी असून इतर ठिकाणी जावे लागू नये म्हणून जांबोटी येथे घर बांधले आहे. चांगले विद्यार्थी निर्माण व्हावेत यासाठी प्रयत्न करीत आहे.
 उदय अथणी, सह शिक्षक

संपादन- अर्चना बनगे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com