उक्कडगावात पिकविली सेंद्रीय हळद 

बाबासाहेब शिंदे 
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

उक्कडगाव येथील प्रगतिशील शेतकरी किरण सुरेश मुळे यांनी बीएस्सीपर्यंतचे शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे न लागता शेती करण्यास सुरवात केली. ते द्राक्षे, डाळिंब, कांदा पिकासह खरीप, रब्बी हंगामातील विविध पिके घेतात. हळद पिकाची उंची जवळपास तीन ते साडेतीन फुटांपर्यंत असते. मात्र मुळे यांनी घेतलेल्या सेंद्रिय हळदीचे पीक सात फुटांपर्यंत असल्याने दिसून येत आहे. मध्य प्रदेशतील पाच गीर गायी असून त्याच्या मलमूत्राचा वापर हळदी पिकास रबडीद्वारे केला जात आहे.

पांगरी (जि. सोलापूर) ः खोडकिडा व योग्य बाजारभाव मिळत नसल्याने नामशेष होत चाललेल्या हळद पिकात वेगळा प्रयोग करत उक्कडगाव (ता. बार्शी) येथील प्रगतिशील शेतकरी किरण मुळे हे दोन एकर क्षेत्रावर सेंद्रिय हळद पीक घेत आहेत. हळद पिकाची उंची जवळपास तीन ते साडेतीन फुटांपर्यंत असते. मात्र सेंद्रिय पद्धतीने घेतलेले हळद पीक चक्क सात फुटांपर्यंत असल्याने दिसून येत आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यात येथे पेटले ऊस दराचे आदोलन

बार्शी तालुक्‍याच्या पूर्व व उत्तर भागात मागील 20 वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात हळद पीक घेतले जात होते. त्यातच उक्कडगाव, शिराळे, घारी या ठिकाणी हळदीची लागवड केली जात होती. त्यावेळी एक शेतकरी कमीत कमी एक ट्रक हळद सहजरीत्या सांगलीच्या बाजारपेठेत पाठवित असे. त्या कालवधीत समाधानकारक भाव व रोगराईचे प्रमाण कमी असल्याने हळद पिकाच्या माध्यमातून शेतकरी सधन बनत होता. मात्र 15-20 वर्षांपासून हळदीस खोडकिडा लागल्याने उत्पादनात कमालीची घट येऊ लागली. त्याचबरोबर वर्षभर सांभाळून या पिकास खर्चाच्या मानाने योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी हळदी पिकाकडे काणाडोळा केला. 

अबब....मत्स्य व्यवसायात 80 टक्क्यांनी घट

उक्कडगाव येथील प्रगतिशील शेतकरी किरण सुरेश मुळे यांनी बीएस्सीपर्यंतचे शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे न लागता शेती करण्यास सुरवात केली. त्यांना शेतीची आवड आहे. ते द्राक्षे, डाळिंब, कांदा पिकासह खरीप, रब्बी हंगामातील विविध पिके घेऊ लागले. द्राक्षची थेट विक्री न करता मनुका शेड उभारून त्यातून भावानुसार विक्री केली जात असते. त्याचबरोबर मध्य प्रदेशतील पाच गीर गायी असून त्याच्या मलमूत्राचा वापर हळदी पिकास रबडीद्वारे केला जात आहे. 

सी.एस.सी. सेंटरवर विमा भरलेल्या शेतकर्यांच्या प्रस्तावात चूक

किरण मुळे यांनी पारंपरिक पद्धतीने दोन एकर क्षेत्रावर शेलम या हळद वाणाची सरीतून लागवड केली. त्यांची तिसरी पिढी हळदीचे उत्पादन घेत आहे. यात त्यांनी पूर्णपणे सेंद्रिय खत, गांडूळ खत, रबडीचा वापर करून हळद जोपासली आहे. यास ठिंबक सिंचनाद्वारे पाणी दिले जात असून सध्या सहा महिन्यांची हळद सहा ते सात फुट उंचापर्यंत वाढली आहे. यातून एकरी 27 क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे. या हळद शेतीसाठी कृषी सहायक एस. व्ही. फड व सेवानिवृत्त कृषी सहायक अशोक मुळे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. 

पूर्णपणे सेंद्रिय खत, गांडूळ खत, रबडीचा वापर करून हळद जोपासली आहे. यास ठिंबक सिंचनाद्वारे पाणी दिले जात असून सध्या सहा महिन्यांची हळद सहा ते सात फुट उंचापर्यंत वाढली आहे. यातून एकरी 27 क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे. 
किरण मुळे,
प्रयोगशील शेतकरी 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sucess story of Organic Turmeric