Koyna Dam : ताकारी लाभक्षेत्रातील शेकडो हेक्टर शेती 'कोयने'वर अवलंबून; पाऊस नसल्याने बळीराजावर मोठे संकट

ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रातील शेकडो हेक्टर शेती केवळ कोयना धरणातील पाण्यावर अवलंबून आहे.
Koyna Dam
Koyna Damesakal
Summary

यंदाच्या पावसाळ्यात कोयना धरणातील पाण्यात अपेक्षित वाढ होत नसल्याने ताकारी लाभक्षेत्रातील शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

वांगी : कायम दुष्काळी असणाऱ्या कडेगाव, खानापूर आणि तासगाव तालुक्यातील बहुतांश गावांना मागील २५ वर्षांपासून सुजलाम्-सुफलाम् केलेल्या ताकारी योजनेचे (Takari Irrigation Scheme) भवितव्य कोयना धरणातील (Koyna Dam) जलसाठ्यावर अवलंबून असते.

यंदाच्या पावसाळ्यात कोयना धरणातील पाण्यात अपेक्षित वाढ होत नसल्याने ताकारी लाभक्षेत्रातील शेतकरी चिंताग्रस्त आहेत. ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रातील शेकडो हेक्टर शेती केवळ कोयना धरणातील पाण्यावर अवलंबून आहे.

Koyna Dam
Deepak Kesarkar : '..तर दीपक केसरकर भाजपमध्ये जातील'; ठाकरे गटाच्या प्रवक्त्याचा मोठा गौप्यस्फोट

यापूर्वी दरवर्षी या भागात कमी पाऊस पडत गेला तरी कोयना धरण भरले की ताकारी लाभक्षेत्रातील शेतकरी निश्चिंत असतात. कारण याच ताकारी पाण्याने मागील २५ वर्षांत वांगी भागात प्रचंड आर्थिक समृद्धी आणली आहे. ताकारीच्या पाण्याने या भागात दृष्ट लागण्यासारखी शेती पिकून सर्वसामान्य लोकांच्या जिवनात झालेला आर्थिक बदल इथली जनता अनुभवत आहे.

ऊस, द्राक्ष, केळी, हळद, आले याशिवाय फळभाज्या व पालेभाज्या उत्पादनातून शेतक-यांनी दरवर्षी करोडो रुपये मिळविले आहेत. शेतकऱ्यांच्या या उत्तरोत्तर आर्थिक प्रगतीला यावर्षी मात्र दृष्ट लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, सदर तीनही तालुक्यात यंदा दीड महिना उलटूनही पावसाने दडी मारली आहे.

Koyna Dam
Vaibhav Naik : ..म्हणून शिंदे गटाचे 'ते' 16 आमदार अपात्र होणार; सुप्रीम कोर्टाचा दाखला देत नाईकांचं स्पष्टीकरण

टंचाईसदृश्य परस्थिती निर्माण होऊन पिण्याच्या पाण्याचेही वांदे सुरु झाले आहेत. त्यामुळे शेतीला चटके बसून उभी पिके करपू लागली आहेत. असे झाले तरी भविष्यात ताकारी योजना सुरु होऊन आपणास हमखास उन्हाळभर पाणी मिळते, याची शाश्वती लोकांना असते. परंतु, यंदा ताकारी योजनेला पाणीपुरवठा करणाऱ्या कोयना धरणावरच पावसाची अवकृपा असून भर पावसाळ्याच्या दीड महिन्यात अवघा २३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

शिवाय मागील पाच दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. परिणामी यंदा धरण भरणार की नाही? याची धाकधूक वाढली आहे. कारण या धरणावरच पश्चिम महाराष्ट्रातील अर्थकारण अवलंबून आहे. दुर्दैवाने कोयना धरणात आवश्यक पाणीसाठा न झाल्यास नदीकाठच्या आणि सिंचन योजनांवरील लाभक्षेत्राचे अपरिमीत नुकसान होणार आहे.

Koyna Dam
CM Siddaramaiah : 'ते' सिद्ध झाल्यास राजकारणातून संन्यास घेईन; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

मागील सात वर्षांतील जुलैपर्यंतचे कोयना धरणातील पर्जन्यमान

वर्ष महिना (जुलैअखेर)

२०१७ ३२६३ मि.मी.

२०१८ ३४६१ मि.मी.

२०१९ २११४ मि.मी.

२०२० १००७ मि.मी.

२०२१ २१७७ मि.मी.

२०२२ १९९८ मि.मी.

२०२३ (११ जुलै) ८८५ मि.मी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com