Khanapur : पर्यटकांसाठी महत्वाची बातमी! 'या' धबधब्यांवर जाण्यास बंदी; नियमांचं उल्लंघन केल्यास होणार कारवाई

खानापूर तालुक्यातील (Khanapur) जंगल (Forest) भागात असलेल्या धबधब्यांवर येणाऱ्या पर्यटकांची हुल्लडबाजी वाढली आहे.
Jamboti waterfalls
Jamboti waterfalls esakal
Summary

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला असून धबधब्याकडे जाणाऱ्या मार्गांवर वन खात्यातर्फे फलक लावून जनजागृती केली जात आहे.

बेळगाव : खानापूर तालुक्यातील (Khanapur) जंगल (Forest) भागात असलेल्या धबधब्यांवर येणाऱ्या पर्यटकांची हुल्लडबाजी वाढली आहे. त्यामुळे अपघातासह जंगलाचे नुकसान होत असल्याने जांबोटी आणि जंगल प्रदेशात असलेल्या धबधब्यांवर नागरिकांना येण्यास वन खात्याने निर्बंध घातले आहेत.

Jamboti waterfalls
Ramdas Athawale : 'वाटेल ते झालं तरी चालेल, मात्र मोदी सरकारला बाबासाहेबांचं संविधान बदलू देणार नाही'

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला असून धबधब्याकडे जाणाऱ्या मार्गांवर वन खात्यातर्फे फलक लावून जनजागृती केली जात आहे. खानापूर तालुक्यात पावसाळ्यात अनेक धबधबे प्रवाहित होतात. त्यामुळे या भागातील धबधबे पर्यटकांना आकर्षित करून घेत असतात.

मात्र, खानापूर तालुक्यातील अनेक भाग दुर्गम असून येथील काही भाग अभयारण्यात मोडतो. त्यामुळे येथील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनी वन खात्याच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र काही दिवसांपासून जांबोटी (Jamboti Waterfalls) आणि परिसरातील विविध धबधब्यांवर मोठ्या प्रमाणात हुल्लडबाजी वाढली आहे.

Jamboti waterfalls
Raju Shetti : 'राज्यातलं शिंदे-फडणवीस-पवार सरकार लुच्चे, त्यांना शिवरायांचं नाव घेण्याचा अधिकार नाही'

तसेच धोकादायक प्रवास केला जात असून जंगल प्रदेशात कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वन खात्याच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. खानापूर तालुक्यातील विविध धबधब्यांवर जाताना कोणत्या धबधब्यावर जाण्यास निर्बंध घातले आहेत. याची माहिती घेऊन जाणे आवश्यक आहे.

अन्यथा वन खात्याच्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते. निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी वन्य प्राण्यांना किंवा जंगल प्रदेशाचे कोणतेही नुकसान होणार नाही याची दखल घेणे गरजेचे आहे. मात्र जंगल प्रदेशातून धोकादायक प्रवास करण्यासह मद्यधुंद अवस्थेत धांगडधिंगा केला जात आहे.

Jamboti waterfalls
Apple Price Hike : टोमॅटोनंतर आता सफरचंदांचे दर कडाडणार; 'या' कारणामुळं देशाला सफरचंदांचा पुरवठा होणार कमी

माहिती देणारे फलक

दोन दिवसांपूर्वी मान येथील धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यामुळे वन खात्याने शुक्रवारी जांबोटी आणि परिसरातील विविध धबधब्यांवर जाणारे रस्ते बंद केले आहेत. तसेच धबधब्यांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर चेक पोस्ट उभारले असून, या ठिकाणी वन खात्याचे कर्मचारी तैनात केले आहेत. विविध भागात मराठीसह कन्नड व इंग्रजीत माहिती देणारे फलक लावले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com