
खंडाळा (जि. सातारा) : पुणे- बंगळूर महामार्गावर खंडाळ्याजवळ सीबीआयचे अधिकारी आहोत, अशी बतावणी करत दोन संशयितांनी केबीनची तपासणी करताना ट्रकचालकाच्या पाकिटातील सुमारे 26 हजार रुपये काढून घेत पाबोरा केला.
जरुर वाचा - त्यांनी झिडकारले; पोलिसाने कवटाळले !
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हातकणंगले येथील विलास खांडेकर हे टेंपोत (एमएच 45 एएफ 6282) जयसिंगपुरातील मधूबन बायोटेक नर्सरीतून उसाची रोपे घेऊन वाल्होड-सूरत येथे गेले होते. तेथून पुन्हा कोल्हापूरच्या दिशेने परतताना आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास खंबाटकी घाटात हॉटेल गीता सागरसमोर दुचाकीवरून (एमएच 12 आरव्ही 4310) आलेल्या दोन अज्ञातांनी "आम्ही सीबीआयचे अधिकारी आहोत. तुझी गाडी चेक करायाची आहे. तू गाडी साईडला घे,' अशी सूचना केली.
हेही वाचा - पुण्यातील युवकाने मित्रांना 20 लाखांना फसविले
त्यामुळे खांडेकर यांनी गाडी महामार्गाच्या बाजूला घेत थांबवली. "तुझ्या गाडीत दारू असल्याची माहिती मिळाली आहे. तुझी गाडी चेक करायची आहे,' असे सांगत दोघे भामटे केबीनमध्ये चढले. केबीन, डिकी चेक करताना त्यांनी डिकीतील पैशाच्या पाकिटातून हातचलाखीने 26 हजार रुपये काढून घेत पाबोरा केला. या घटनेचा तपास पोलिस गिरीश भोईटे करीत आहेत.
हेही - एन्काउंटरप्रकरणातील पोलिसांना ब्रेव मेन पुरस्कार देणार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.