सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना उदयनराजेंचे उत्तर; म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 सप्टेंबर 2019

सोशल मीडियावर ट्रोल करणारे ट्रोलर हे टाईमपास करत असतात. दुसऱ्याची खिल्ली उडविणे हेच यांचे काम असते. दुसऱ्याची खिल्ली उडवायला अक्कल अजिबात लागत नाही, अशा शब्दात आज (ता.15) उदयनराजे भोसले यांनी सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांची कानउघडणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या उदयनराजे यांनी त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिले.

सातारा : सोशल मीडियावर ट्रोल करणारे ट्रोलर हे टाईमपास करत असतात. दुसऱ्याची खिल्ली उडविणे हेच यांचे काम असते. दुसऱ्याची खिल्ली उडवायला अक्कल अजिबात लागत नाही, अशा शब्दात आज (ता.15) उदयनराजे भोसले यांनी सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांची कानउघडणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या उदयनराजे यांनी त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिले.

अधिक वाचा : उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादी देणार तगडा उमेदवार; 'या' नावाची आहे चर्चा

उदयनराजे म्हणाले, दुसऱ्यावर चिखलफेक करायला अक्कल लागत नसते. एखादे काम करत असताना त्यासाठी परिश्रम घ्यायला लागतात. त्याला वेळ द्यायला लागतो. हे ट्रोल करणारांनी स्वतःच्या कुटुंबाला वेळ देण्याचा सल्लाही उदयनराजेंनी दिला आहे. मला या ट्रोलर्सची पर्वा नसून माझं मन साफ आहे. लोक खूश आहेत. लोकांची कामे होत आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

अधिक वाचा : उदयनराजेंनी टेबलवर मारल्या बुक्या

लोकांच्या झोपड्या आहेत. आता त्यांना भक्कम घरे मिळतील. काही लोकांना तर घरे मिळालीही आहेत. माझ्या मतदारसंघात एकही झोपडी दिसणार नाही, प्रत्येकाला त्यांचे हक्काचे चांगले पक्के घर देणार असल्याचेही उदयनराजे यांनी यावेळी सांगितले आणि माझं लक्ष हे लोकांच्या कामाकेच राहील मी ट्रोल केलं तरी मला पर्वा नसल्याचे उदयनराजेंनी यावेळी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udayan Raje answers social media trollers