
पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शिवसेनेतर्फे खानापूर रस्त्यालगत मदत केंद्र सुरू केले आहे. या सहायता मदत केंद्रास श्री. ठाकरे यांनी भेट दिली. त्यावेळी शेतकऱ्यांनी द्राक्ष, सोयाबीन, कडधान्य, डाळिंब पिकांचे लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले.
विटा ( सांगली) - खानापूर तालुक्यातील विटा व कडेगांव तालुक्यातील नेवरी येथे अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या टोमॅटो, द्राक्ष व डाळिंब बागांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पाहणी केली. पाहणी दरम्यान नुकसानग्रस्त शेतकरी भावनिक झाले. त्यांच्या डोळ्यात अश्रू उभारले. त्यावेळी श्री. ठाकरे यांनी शेतकऱ्यांनो खचून जावू नका, धीर धरा. राज्यपालाकडे पाठपुरावा करून नुकसान भरपाई मिळवून देऊ, अशी ग्वाही दिली.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी उद्धव ठाकरे यांची ही घोषणा
पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शिवसेनेतर्फे खानापूर रस्त्यालगत मदत केंद्र सुरू केले आहे. या सहायता मदत केंद्रास श्री. ठाकरे यांनी भेट दिली. त्यावेळी शेतकऱ्यांनी द्राक्ष, सोयाबीन, कडधान्य, डाळिंब पिकांचे लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले.
शेतकऱ्यांनी मांडली व्यथा
यावेळी सुळेवाडी येथील दादासो पवार या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने श्री. ठाकरे यांच्यासमोर बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले. त्यावेळी श्री. ठाकरे यांनी धीर धरा असे खचून जावू नका, असे सांगितले. यावेळी शेतकऱ्यांनी १५ मेपासून विद्युतपंप सुरू केले नाहीत. विज बिलात मदत मिळावी, अशी मागणी केली.
या ठिकाणाहून हापूस सांगलीत दाखल
राज्यपालांकडून नुकसान भरपाई मिळवून देवू
श्री. ठाकरे म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ व मराठवाड्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत त्यांना दिलासा देणे गरजेचे आहे. सत्ता स्थापनेचे घोडे अडले असले तरी राज्यपालाकडून नुकसान भरपाई मिळवून देवू.
PHOTOS : शंभरीतही नेमाने सूर्यनमस्कार घालणाऱ्या लक्ष्मीबाई
यावेळी आमदार अनिल बाबर, माजी जलसंपदामंत्री विजय शिवतारे, खासदार विनायक राऊत, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे, आमदार मोहनराव कदम, विश्वजीत कदम, नितीन बानुगडे- पाटील, प्रकाश शेंडगे, माजी मंत्री अजितराव घोरपडे, अमोल बाबर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभूते, आनंदराव पवार, तानाजी पाटील, आण्णासो पत्की यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.