Vidhan Sabha 2019 : अमित शहांच्या प्रश्नाला शरद पवारांनी काय दिले उत्तर?

vidhan sabha 2019 ncp leader sharad pawar answers Amit Shah Akole speech
vidhan sabha 2019 ncp leader sharad pawar answers Amit Shah Akole speech

अकोले (अहमदनगर) : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात न उतरलेले ज्येष्ठ नेते शरद पवार सध्या निवडणुकीच्या केंद्र स्थानी आहेत. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी शरद पवार यांना तुम्ही 15 वर्षांत काय केलं असा प्रश्न विचारला होता. त्यावर आता शरद पवार यांनी प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. अहमदनगर  जिल्ह्यातील अकोले येथील जाहीर सभेत ते बोलत होते.

तरुणांच्या हाताला काम दिले : शरद पवार
पंतप्रधान मोदी यांच्या मागे मागे राहून अमित शहा यांनी केंद्रात गृहमंत्रीपद मिळाले आहे, असा टोला शरद पवार यांनी अकोले येथील सभेत लगावला. पंधरा वर्षांत काय केले? या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले, 'महाराष्ट्राला उद्योगधंद्यात क्रमांक एकवर नेण्याचं काम, काँग्रेस-राष्ट्रवादीनं केलंय. एकेकाळी राज्यातील सगळे उद्योगधंदे मुंबईत होते. त्यामुळे ग्रामीण भागात तरुणांच्या हाताला काम नव्हते. त्यामुळे नाशिक, औरंगाबाद, पुणे, नागपुरात एमआयडीसी उभारून त्या परिसरातील तरुणांच्या हाताला काँग्रेस-राष्ट्रवादीनं काम दिलंय. काँग्रेसच्या काळात 1978मध्ये रोजगार हमी योजना कायदा मंजूर करून घेण्यात आला. देशात महिलांना 50 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय सर्वप्रथम महाराष्ट्रात घेण्यात आला. मी मुख्यमंत्री असताना हा कायदा करण्यात आला.'

शरद पवार यांचे प्रत्युत्तर

  1. काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारने जनतेला विश्वासात घेऊन मंडल आयोगाचा निर्णय घेतला
  2. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव कोणी दिले?
  3. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने विद्यापीठ उभे केले; तुम्ही काय केले?
  4. मुंबईतील बंद पडलेल्या इंदू मिलमध्ये डॉ. आंबेडकरांचे स्मारक उभारण्याच्या निर्णय आघाडी सरकारच्या काळात

पवार म्हणतात, भाजपने 'हे' केले

  1. शिवस्मारकासाठी जलपूजन केले; पाच वर्षांत पुढे काहीच घडले नाही
  2. इंदू मिल स्मारकाची केवळ घोषणाच, तेथे कसलेही काम झाले नाही
  3. शिवाजी महाराजांचे उठता बसता नाव घेतात आणि त्यांच्या किल्ल्यांवर पर्यटन केंद्राच्या नावाखाली बार सुरू करण्याची घोषणा करतात.
  4. राज्यात कर्जमाफी जाहीर केली; 50 हजार कोटी गेले कोठे?
  5. भाजपच्या काळात महाराष्ट्राची ओळख आत्महत्यांचे राज्य अशी झाली
  6. राज्यात सोळा हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com