Vidhan Sabha 2019 : मतदानानंतर संभाजी भिडे यांनी मतदारांना केले 'हे' आवाहन...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

सांगली - येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आज मतदानाचा हक्क बजावला. गावभागातील संत मामा केळकर विद्यामंदिरात त्यांनी रांगेत उभे राहून मतदान केले.  मतदान झाल्यावर भिडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला व  सर्वच उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.

सांगली - येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आज मतदानाचा हक्क बजावला. गावभागातील संत मामा केळकर विद्यामंदिरात त्यांनी रांगेत उभे राहून मतदान केले.  मतदान झाल्यावर भिडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला व  सर्वच उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.

मतदानानंतर पत्रकाराशी बोलताना श्री. भिडे म्हणाले,  मतदान हे राजकिय नाही तर हे देशाच्या भविष्यासाठी मतदान आहे. मातृभुमीच्या कल्याणासाठी हे मतदान आहे. देशाच्या भवितव्यासाठी आहे. मातृभुमीचे उपकार फेडण्यासाठी हे मतदान आहे. राष्ट्र म्हणून टिकण्यासाठी मतदान हे अत्यंत गरजेचे आहे. हे राष्ट्र कर्तव्य, धर्म कर्तव्य म्हणून मतदान करणे हे अत्यंत आवश्यक आहे. 

Vidhan Sabha 2019 : पावसामुळे कोल्हापुरात सकाळीच मतदान केंद्रावर गर्दी

कोल्हापूर, सांगली भागात गेले काही दिवस परतीच्या पावसाचा जोर आहे. त्यामुळे याचा परिणाम मतदान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्री भिडे म्हणाले, पावसाचा मतदानावर परिणाम होईल असे मला वाटत नाही. पाऊस असला तरी नागरिकांनी मतदानाचे कर्तव्य हे बजावायलाच हवे. पाऊस आहे असे फालतू कारण लोकांनी न सांगता मतदानाला बाहेर पडायला हवे. लेकरू ओरडायला लागल्यानंतर जसे आई त्याला पदराखाली घेते. हे जसे आईचे सहज कर्तव्य आहे. तसे मतदानाच्या बाबतीत व्हायला हवे. इतकी सहजता त्यात असायला हवी. 

Vidhan Sabha 2019 : कोल्हापूर दक्षिणमध्ये जवाहर केंद्रावर मतदान यंत्रात बिघाड 

निवडणूकीबाबत बोलताना श्री. भिडे म्हणाले, सर्वच पक्षाचे उमेदवार उभे राहीले आहेत. त्यांनी एक लक्षात ठेवावे. आपण सर्व मातृभूमीची लेकरे आहेत. त्यांनी भारत मातेच्या संसारासाठी काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. या सर्व उमेदवारांना माझ्या सद्भावना, सदिच्छा आहेत. 

दरम्यान सांगली जिल्ह्यातील आठ ही विधानसभा मतदार संघात आज सकाळी शांततेत मतदान सुरू झाले. पहिल्या दोन तासात 3.81 टक्के मतदान झाले होते. जिल्ह्यात एकूण 23 लाख 76 हजार 904 मतदार असून 2435 मतदान केंद्र आहेत काल दिवसभर पाऊस सुरू होता. सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे सकाळपासून मतदान संथ गतीने सुरू आहे.

पलूस - कडेगाव आणि तासगाव कवठेमहांकाळ या दोन मतदारसंघात पहिल्या दोन तासात सुमारे आठ टक्के मतदान झाले होते. तर जिल्ह्यात एकूण सुमारे चार टक्के मतदान झाले होते. आज सकाळपासून येथे पावसाचे सरी पडत होत्या. दरम्यान, भाजपचे उमेदवार आमदार सुधीर गाडगीळ, काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी सकाळी मतदानाचा हक्क बजावला. 

शेतीत साकारले छत्रपती संभाजीराजे यांचे चित्र 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Sambhaji Bhide done voting in Sangli