
शिराळा येथे नागपंचमीचा पारंपरिक उत्सव ढोल-ताशांच्या गजरात साजरा होत आहे.
मानाच्या पालखीची विधिवत पूजा करून मिरवणूक अंबामाता मंदिरात रवाना झाली.
यंदा प्रथमच महिलांनी स्वतःचे नागराज महिला मंडळ स्थापन करून उत्सवात सहभाग घेतला.
32 Shirala Nag Panchami Videos : सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे आज नागपंचमी उत्सव मोठ्या जल्लोषात सुरु झाली आहे. कोतवाल यांनी आणलेल्या मातीच्या नागाची पूजा करून महाजन यांच्या घरी मानाच्या पालखीची विधिवत पूजा करण्यात आली त्यानंतर पालखीची पारंपारिक वाद्यात अंबामात मंदिराकडे मिरवणूक निघाली आहे.या मानाच्या पालखीचे दर्शन आमदार सत्यजित देशमुख,माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक यांनी घेतले आहे.
यावर्षी शिराळा येथे प्रथमच महिलांनी जय जिजाऊ महिला नागराज महिला मंडळाची स्थापन केली पारंपारिक ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून अंबामाता मंदिरात दर्शन घेतले. नाग मंडळांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. या गावात जिवंत नागाची पूजा करण्याची जुनी परंपरा आहे. परंतु अनेक वर्षे जीवंत नाग पकडण्याला बंदी होती. पण यंदाच्या वर्षी पूर्ण काळजी घेऊन नाग पकडण्याला परवानगी देण्यात आली. यावेळी गावात नागा साधू आले आहेत.
पर्यावरण, वन आणि जलवायु परिवर्तन मंत्रालय, वन्यजीव विभाग नवी दिल्ली यांचेकडून २१ नागरिकांना शैक्षणिक उद्देशासाठीच व स्थानिक लोकांमध्ये, समाजामध्ये सर्प संवर्धनाविषयी पारंपारीक ज्ञान प्रसारण करण्यासाठी जीवंत नाग पकडण्याची परवानगी मिळाल्याने आज शिराळा येथे जीवंत नाग मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी वन कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली दाखवून प्रबोधन केले जात आहे.त्यामुळे येणाऱ्या भाविकांना २३ वर्षा नंतर पुन्हा एकवेळा नाग दर्शन झाले आहे.
What is the specialty of Nagpanchami in Shirala?
A1. शिराळ्यात नागपंचमी पारंपरिक मिरवणूक, मातीच्या नागांची पूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध आहे.
Q2. Who organizes the main palanquin procession in Shirala?
A2. मानाची पालखी महाजन घराण्याकडून आयोजित केली जाते आणि कोतवाल मातीचा नाग घेऊन येतो.
Q3. What was special about this year's Nagpanchami?
A3. यंदा प्रथमच ‘जय जिजाऊ नागराज महिला मंडळा’ने महिलांसाठी मिरवणूक काढली.
Q4. Where does the Nagpanchami procession end?
A4. मिरवणूक अंबामाता मंदिरात जाऊन समाप्त होते.
Q5. Which famous personalities attended the event?
A5. आमदार सत्यजित देशमुख व माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक यांनी पालखीचे दर्शन घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.