व्हेल माशाच्या उलटीची तस्करी; आंतरराष्ट्रीय रॅकेट असण्याची शक्यता, वन विभागाची दोन पथकं तपासासाठी रवाना

व्हेल माशाच्या उलटी (अंबरग्रीस) तस्करीच्या तपासासाठी वनविभागाने (Forest Department) दोन पथके तयार केली आहेत.
Whale Fish Vomit
Whale Fish Vomitesakal
Summary

व्हेल माशाची उलटी वन विभागाचे अनुसूची १ मध्ये येत असून त्याच्या तस्करीसाठी ३ ते ७ वर्षांची शिक्षा व २५००० रुपये दंडाची तरतूद आहे.

शिराळा : सागाव (ता. शिराळा) येथे सापडलेल्या व्हेल माशाच्या उलटी (अंबरग्रीस) तस्करीच्या तपासासाठी वनविभागाने (Forest Department) दोन पथके तयार केली आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय रॅकेट असण्याची शक्यता आहे का, याची माहिती घेण्यासह अन्य संशयितांच्या शोधासाठी उपवनसंरक्षक नीता कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक डॉ. अजित साजणे, मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी पथके रवाना झाली आहेत.

Whale Fish Vomit
Meteor Shower : कोल्हापूरकरांनी अनुभवला 'उल्कावर्षाव'; तासाला 50 ते 60 उल्का पडत असल्याचं केलं निरीक्षण

शुक्रवारी (ता. १५) व्हेल माशाच्या उलटी (Whale Fish Vomit) तस्करीप्रकरणी सांगली, कोल्हापूर, लातूर जिल्ह्यांतील रोहन सर्जेराव पाटील (२९ कोनवडे, ता. भुदरगड जि. कोल्हापूर), प्रथमेश सुरेश मोरे (२३, सोळंबी, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर), दिग्विजय उत्तम पाटील (२४, सागाव, ता. शिराळा), लक्ष्मण सुखदेव सावळे (३४, लातूर, सध्या कळंबोली, मुंबई), दत्तात्रय आनंदराव पाटील (४१, बिऊर, ता. शिराळा) या पाच जणांच्या टोळीला बनावट ग्राहकाच्या मदतीने सागाव येथे वन विभागाने मोठ्या शिताफीने अटक केली होती.

Whale Fish Vomit
'बिद्री'चा दर राज्यात भारी! उसाला उच्चांकी प्रतिटन 3,407 रुपये दर; के. पी. पाटलांकडून मोठी घोषणा

त्यांच्याकडून ८ ग्रॅम उलटीचा नमुना, पाच मोबाईल, दोन मोटारसायकली जप्त केल्या होत्या. त्यानंतर त्यांना शिराळा न्यायालयात हजर केले असता गुरुवारपर्यंत (ता. २१) वन कोठडी सुनावली आहे. पुढील तपासात आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस होण्याची दाट शक्यता असून आणखी नावे निष्पन्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दोन वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून संशयितांची शोधमोहीम सुरू आहे. या घटनेमुळे शिराळा तालुक्यासह सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

उपवनसंरक्षक नीता कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक डॉ. अजित साजणे, मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी, वनपाल अनिल वाजे, वनरक्षक हणमंत पाटील, विशाल डुबल, भिवा कोळेकर, रजनीकांत दरेकर, बाबासाहेब गायकवाड, मोहन सुतार यांच्या पथकाने ही कारवाई केली. वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी अधिक तपास करत आहेत.

Whale Fish Vomit
मोदी सरकारचं एक पाऊल मागे; आता फक्त 17 लाख टन साखर इथेनॉलकडे वळवण्यास केंद्राची परवानगी

व्हेल माशाची उलटी वन विभागाचे अनुसूची १ मध्ये येत असून त्याच्या तस्करीसाठी ३ ते ७ वर्षांची शिक्षा व २५००० रुपये दंडाची तरतूद आहे.

-नीता कट्टे, उपवनसंरक्षक (प्रा.), सांगली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com