Republic Day 2020 : आरडी परेड म्हणजे काय रे भाऊ? 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 January 2020

26 जानेवारी रोजी दिल्लीत राजपथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी व्हावे, असे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. रिपब्लिकन डे अर्थात आरडी परेड ही अत्यंत मानाची समजली जाते. या परेडमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थी प्रचंड मेहनत करतात. एनसीसी आणि एनएसएसच्या विविध चाचण्यांतून विद्यार्थ्यांची आरडीसाठी निवड केली जाते. 1 जानेवारी ते 30 जानेवारी या कालावधीत निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची दिल्लीत राहण्याची व्यवस्था केली जात असते.

26 जानेवारी रोजी दिल्लीत राजपथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी व्हावे, असे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. रिपब्लिकन डे अर्थात आरडी परेड ही अत्यंत मानाची समजली जाते. या परेडमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थी प्रचंड मेहनत करतात. एनसीसी आणि एनएसएसच्या विविध चाचण्यांतून विद्यार्थ्यांची आरडीसाठी निवड केली जाते. 1 जानेवारी ते 30 जानेवारी या कालावधीत निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची दिल्लीत राहण्याची व्यवस्था केली जात असते. या कालावधीत या विद्यार्थ्यांचा सराव करून घेतला जातो. या दरम्यानचा संपूर्ण खर्च केंद्र सरकारतर्फे केला जातो. 

हे पण वाचा -  Republic Day 2020 :माहीत करून घ्या संविधान निर्मितीतील काही रंजक घटना

आरडीचे संचलन राजपथ मार्गाद्वारे रायसीना हिलपासून राष्ट्रपती भवनापर्यंत केले जाते. या संचलनाआधी पंतप्रधान अमर जवान ज्योती येथे पुष्पचक्र अर्पण करतात. त्यानंतर देशासाठी हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येते. त्यानंतर पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर जातात. त्या ठिकाणी ते प्रजासत्ताक दिनासाठी आलेल्या पाहुण्यांना भेटतात. त्याचवेळी पाहुण्यांसोबत राष्ट्रपतींचे आगमन होते आणि राष्ट्रगीत सुरू होते. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजवंदन होते. त्यानंतर देशासाठी शौर्य गाजविलेल्या जवानांना राष्ट्रपतींच्या हस्ते कीर्ती चक्रासह अशोक चक्र प्रदान करण्यात येते. पुरस्कार सोहळ्यानंतर राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने सन्मानित केलेली बालके सजविलेल्या हत्तीवरून संचलनात सहभागी होतात. 

हे पण वाचा - Republic Day 2020 : भारताच्या प्रजासत्ताक दिनाबद्दल तुम्हाला हे माहित आहे का?

भारताच्या तिन्ही प्रकारांतील सैन्य म्हणजेच नौदल, पायदळ आणि वायुसेना. वेगवेगळे सेना विभाग, घोडदळ, पायदळ अद्ययावत शस्त्रांसह संचलन करतात. राष्ट्रातील या सैन्यांची मानवंदना स्वीकारतात. या संचलनाच्या सादरीकरणासाठीची पूर्वतयारी खूप काळजीपूर्वक आणि शिस्तीने केली जाते. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीत 1950 ला राजपथावर पहिल्या संचलनाचे आयोजन केले होते. 

हे पण वाचा - Republic Day 2020 : जाणुन घ्या... महाराष्ट्राचे चित्ररथ केव्हा नव्हते संचलनात

या संचलनासाठी भारतातील राज्ये आपापले चित्ररथ पाठवितात. या चित्ररथाच्या सादरीकरणाला विशेष पारितोषिकही दिले जाते. 2018 ला दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या संयोजनात राजपथावर सादरीकरण करणाऱ्या 160 विद्यार्थ्यांना प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले होते. पंतप्रधानांसह दहा आशियान देशांच्या प्रमुखांसमोर या विद्यार्थ्यांनी आपली नृत्यकला सादर केली होती. तर त्या आधी 2017 ला महाराष्ट्राच्या चित्ररथाचा तिसरा क्रमांक आला होता. त्यावेळी महाराष्ट्राने लोकमान्य टिळक यांच्या 160 व्या जयंतीनिमित्त देखावा सादर केला होता. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What is the RD Parade