तरुणाईला का आवडतात "ही' गाणी?

सुस्मिता वडतिले
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

- तरुण पिढी नव्या रूपाला भुलली 
- जुन्या गाण्याचे भाव काही औरच 
- आजकाल होतेय जुन्या गाण्याचे रिमेक

सोलापूर : परिवर्तन हा समाजाचा नियम आहे. काळानुसार अनेक गोष्टीत बदल होतो आणि तो आवश्‍यक असतो. याला संगीत कसं बरं अपवाद ठरेल. आजच्या काळातील संगीताचे सूर तीव्र झालेत व त्यातून आवाज शोधून काढणे कठीण होत असले तरी हेच संगीत आजच्या तरुण पिढीला अधिक भावत आहे. ही वास्तुस्थिती आहे. जुनं ते सोनं असले तरी नवं ते हवचं. तरुण पिढी जुन्या गाण्यांच्या नव्या रूपाला भुलली असून सध्या सुरू असलेल्या जुन्या गाण्यांच्या रिमेकला पसंती देत आहे. 

हेही वाचा : शरद पवार लिहितात, 'राजकीय सत्ता दोघांच्या आणि संपत्ती मूठभरांच्या हातात'

संगीत आणि माणसांचे एक वेगळं नातं आहे. संगीताशिवाय माणूस अपूर्ण आहे. पण खरंच आजचं संगीत, त्यातील शब्द, गाण्याची चाल याचं स्वरूपच बदलले आहे. जुन्या गाण्यांत जो सूर, ताल, लय, भावना होती, ती नाहीशी होत आहे. पूर्वी गाण्याला योग्य त्या शब्दांची साथ असायची. चालीमुळे ते ऐकायला रसभरीत वाटायचं. परंतु ते आता कुठेतरी हरवत चालले दिसून येत आहे. ही वाटणारी खंत अतिशय योग्य आहे. पूर्वीच्या गाण्यातील भावना आजच्या गाण्यात दिसतच नाही. जुन्या गाण्याची काय चाल होती, शब्द काय असत, त्या गाण्यात काय अर्थ दडलेला असायचा, पण आज ते कुठेच पाहावयास मिळत नाही. 

हेही वाचा : शाहरुखला भेटलेली ही गायिका आहे तरी कोण 

पूर्वी गीतांत दिल्या जाणाऱ्या उपमा वास्तविक गोष्टींसोबत केलेली तुलना आता कुठेतरी गायब झाली आहे. आताच्या गीतांत वेगळेपणा असला तरी जुन्या गाण्याची जागा ते घेणे शक्‍य नाही. सध्याच्या गाण्यात फक्त अन्‌ फक्त तरुणाई कशी थिरकतील हे पाहिलं जातं. आधी चाल मग शब्दरचना या परिस्थितीमुळे सध्याची गाणी तरुणाईला आवडत असली तरी ती तात्पुरत्या स्वरूपाची असतात. जुन्या गाण्यांत जे माधुर्य असायचं त्याचं प्रमाण हल्लीच्या संगीतात दिसणं दुर्मिळ झाले आहे. जुन्या गाण्याचे रिमेक आजकालचे गायक करताहेत. काळानुरूप संगीतात बदल होत गेले. त्यामुळे जुन्या पिढीला जुन्या गाण्यांची आणि नव्या पिढीला नव्या गाण्यांची ओढ लागली आहे. परंतु आता पाहता गाण्यातील शब्द कमी झाले असून फक्त संगीत जास्त प्रमाणात वापरले जात आहे. 

आजच्या गाण्यात लयबद्धता कमी झाली आहे. कित्येक वर्षांपासून जुनी गाणी आजही त्याच शांत मनाने ऐकली जातात. मित्रांबरोबर सहलीला जाणं असो वा गप्पांच्या मैफली असो सर्वांच्या ओठांवर हमखास जुनी गाणीच असतात. कारण, जुन्या गाण्याचे भाव काही औरच आहेत. 

जुन्या गाण्यांचे काही प्रसिद्ध रिमेक 
- चांदी के डालपर सोने का मोर 
- आखॅं मारे ऐ लडका आखं मारे 
- तम्मा तम्मा लोगे 
- तेरे दरपर सनम चले आए 
- दिलबर दिलबर 
- मैंने तुझको देखा 
- लैला में लैला 
- तू चीझ बडीं है मस्त 
- झिंग झिंग झिंगाट 
- ढगाळा लागली कळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why the youth Love this song?