Vidhan Sabha 2019 : 'सर्वकाही शिवसेना आमदारांचे संख्याबळ वाढविण्यासाठीच!' : आदित्य ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 12 October 2019

मला मुख्यमंत्री पदाची मनीषा नाही. शिवसेना आमदारांचे संख्याबळ वाढविण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. जिकडेतिकडे भगवा फडकला पाहिजे.

कोयनानगर : ''राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार आहे. माझे स्वप्न मुख्यमंत्री होण्याचे नसले तरी मला नवमहाराष्ट्र घडवायचा आहे, हे करण्यासाठी सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेना पक्षाला आमदाराचे संख्याबळ महत्त्वाचे आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून द्यावे,'' असे आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. मुख्यमंत्री पदावर शिवसेनेचाच दावा असून आपणच शिवसेनेचे गटनेते असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी यावेळी दिले आहेत.

सातारा जिल्ह्यातील शिवसेनेचे उमेदवार शंभुराज देसाई यांच्या प्रचारार्थ पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते  बोलत होते. यावेळी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले, पाटण विधानसभेचे उमेदवार आमदार शंभुराज देसाई, कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानगुडे-पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंत शेलार, शिवसेना नेते पुरुषोत्तम जाधव, युवासेना जिल्हाप्रमुख रणजित भोसले आदी उपस्थित होते. 

- #Forbesची यादी जाहीर; जाणून घ्या भारतातीत सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि त्यांच्या संपत्तीबद्दल

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, ''विधानसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना-भाजपा आणि मित्रपक्ष या महायुतीचे शासन सत्तेवर येणार आहे. या सरकारच्या माध्यमातून मला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. कर्जमुक्त, दुष्काळमुक्त, प्रदूषणमुक्त, उद्योगक्षेत्रात अव्वल असणारा महाराष्ट्र निर्माण हे स्वप्न व संकल्प पूर्ण करण्यासाठी शिवसेनेला आमदारांच्या संख्याबळाची गरज आहे. मला मुख्यमंत्री पदाची मनीषा नाही. शिवसेना आमदारांचे संख्याबळ वाढविण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. जिकडेतिकडे भगवा फडकला पाहिजे."

- Vidhan Sabha 2019 : विरोधी पक्ष जीवंत असेल तर सरकार वठणीवर येईल : प्रकाश आंबेडकर

पाटण तालुक्यात महायुतीचे शिवसेना उमेदवार शंभुराज देसाई हे निवडून येणारच आहेत, आता केवळ औपचारिकता राहिली आहे. त्यांच्यासाठी सभांची गरजच नाही, हे याठिकाणी असलेले वातावरण बघून ते प्रचंड मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास ठाकरेंनी व्यक्त केला. 

- Satellite Shankar: सॅटेलाइट शंकरचा पोस्टर रिलिज, सुरज पांचोलीचा दमदार लूक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yuva Sena President Aditya Thackeray comment about Vidhan Sabha election 2019