पिंपरी-चिंचवड शहरात आज 1236 जणांना डिस्चार्ज 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 1 October 2020

पिंपरी-चिंचवड शहरातील एक हजार 236 रुग्णांना गुरुवारी (ता. 1) डिस्चार्ज मिळाला.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील एक हजार 236 रुग्णांना गुरुवारी (ता. 1) डिस्चार्ज मिळाला. आज 633 जणांचा अवहाल पॉझिटिव्ह आला. एकूण रुग्णसंख्या 78 हजार 714 झाली असून, बरे झालेल्यांची संख्या 71 हजार 124 झाली आहे. सध्या सहा हजार 267 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील पाच आणि बाहेरील चार, अशा नऊ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 323 आणि शहराबोहरील मृतांची संख्या 493 झाली आहे. 

पिंपरी-चिंचवडमधील कोविड सेंटर होणार बंद; कारण ऐकून मिळेल दिलासा

आज मृत्यू झालेले शहरातील नागरिक चऱ्होली (पुरुष वय 63), दिघी (पुरुष वय 72), थेरगाव (पुरुष वय 72), पिंपळे गुरव (पुरुष वय 61 व स्त्री वय 70) येथील रहिवासी आहेत. आज मृत्यू झालेले शहराबाहेरील नागरिक चाकण (पुरुष वय 58), पाषाण (स्त्री वय 76), पुणे कॅम्प (पुरुष वय 88), रांजणगाव (पुरुष वय 60) येथील रहिवासी आहेत. 

आगीनं आमची रोजी रोटीच केली खाक; पिंपरीतील दीडशे महिलांचा आक्रोश

'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेअंतर्गत एक हजार 314 पथकांद्वारे शहरात घरोघरी सर्वेक्षण सुरू आहे. आजपर्यंत 18 लाख 79 हजार 217 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये एक हजार 304 नागरिकांच्या घशातील द्रावाचे नमुने तपासण्यात आले. त्यातील 286 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. 

निवृत्त झालेल्या ड्रायव्हर काकांसाठी अतिरिक्त आयुक्त स्वत: बनले ड्रायव्हर

कोरोना संसर्ग झालेले रुग्ण आढळून आलेल्या भागातील अर्थात कंटेन्मेंट झोनमधील 11 हजार 28 कुटुंबातील 33 हजार 550 जणांची तपासणी करण्यात आली. एका पॉझिटिव्ह रुग्णांमागे 14 संशयित नागरिकांची तपासणी केली जात आहे. सध्या महापालिका रुग्णालयांत चार हजार 993 नागरिकांवर उपचार सुरू आहेत. आज 321 जणांचे अलगीकरण करण्यात आले. शहरातील एकूण 51 हजार 911 जण अलगीकरणात आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1236 corona patients discharged in pimpri chinchwad thursday 1 october 2020