पिंपरी-चिंचवड शहरात 166 नवीन रुग्ण; तर ५ जणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 January 2021

पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी 166 रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या 99 हजार 411 झाली आहे. आज 119 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 96 हजार 70 झाली आहे. सध्या एक हजार 549 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील दोन व शहराबाहेरील तीन रुग्णांचा मृत्यू झाला.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी 166 रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या 99 हजार 411 झाली आहे. आज 119 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 96 हजार 70 झाली आहे. सध्या एक हजार 549 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील दोन व शहराबाहेरील तीन रुग्णांचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील एक हजार 792 आणि शहराबाहेरील 753 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 327 जणांनी लस घेतली. आजपर्यंत एक हजार 274 जणांनी लस घेतली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या रुग्णालयांत 656 रुग्ण उपचार घेत आहेत. 893 रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोनमधील 756 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. त्यातील दोन हजार 686 जणांची तपासणी केली. 819 जणांचे आज विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत एक लाख चार हजार 873 जणांचे विलगीकरण करण्यात आले. 

चोरीला गेलेले दागिने पुन्हा मिळाल्याचा विश्‍वासच बसत नाही

आज दोन हजार 216 संशयित रुग्णालयात दाखल झाले. एक हजार 793 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. एक हजार 288 जणांचे रिपोर्ट प्रतीक्षेत आहेत. दोन हजार 167 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

21 पक्ष्यांचा अचानक पिंपरी चिंचवड शहरात मृत्यू 

आजपर्यंत सहा लाख 239 संशयित रुग्णालयात दाखल झाले. चार लाख 97 हजार 747 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. पाच लाख 96 हजार 420 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

उधार न दिल्याने चायनीज सेंटरची तोडफोड; बोपखेलमधील प्रकार

आज मृत्यू झालेले शहरातील महिला चिंचवड (वय 45) व सांगवी (वय 64) येथील रहिवासी आहेत. आज मृत्यू झालेले शहराबाहेरील नागरिक पुरुष नगर (वय 57) व महिला जुन्नर (वय 67) व आर्वी पुणे (वय 72) येथील रहिवासी आहेत.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 166 new patients in Pimpri Chinchwad city 5 people died