पिंपरी-चिंचवड शहरात आज नवीन 192 रुग्ण; तर पाच जणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 November 2020

पिंपरी-चिंचवड शहरात आज 192 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 90 हजार 481 झाली आहे. आज 173 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 87 हजार 171 झाली आहे. सध्या एक हजार 724 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील चार आणि बाहेरील एक अशा पाच जणांचा मृत्यू झाला.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात आज 192 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 90 हजार 481 झाली आहे. आज 173 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 87 हजार 171 झाली आहे. सध्या एक हजार 724 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील चार आणि बाहेरील एक अशा पाच जणांचा मृत्यू झाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 586 आणि शहराबाहेरील मृतांची संख्या 656 झाली आहे. आज मृत्यू झालेले शहरातील पुरुष साईमंदिर वडमुखवाडी (वय 55) आणि महिला आकुर्डी (वय 75), पिंपरी (वय 84) व काळेवाडी (वय 65) येथील रहिवासी आहेत. आज मृत्यू झालेले शहराबाहेरील पुरुष करंदी (वय 62) येथील रहिवासी आहेत.

"मी इथला भाई आहे' अशी धमकी देत मागितली खंडणी  

सध्या महापालिका रुग्णालयांत केवळ 648 रुग्ण उपचार घेत आहेत. एक हजार 76 रुग्ण होम आयसोलेट आहेत. रुग्णालयात दाखल शहराबाहेरील रुग्णांची संख्या 119 आहे. आजपर्यंत शहराबाहेरील सहा हजार 979 रुग्ण बरे झाले आहेत. 

नदीत बुडून पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

कंटेन्मेंट झोन मधील एक हजार 622 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट देऊन पाहणी केली. त्यात पाच हजार 377 जणांची तपासणी करण्यात आली. आज 317 जणांचे विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत 66 हजार 669 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 192 new patients in Pimpri Chinchwad today and five death