पिंपरी-चिंचवडकरांनो चिंता वाढली; आज वाढलेले रुग्ण पाहून तरी काळजी घ्या

पिंपरी-चिंचवडकरांनो चिंता वाढली; आज वाढलेले रुग्ण पाहून तरी काळजी घ्या

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मंगळवारी रात्री पावणेनऊ वाजेपर्यंत तीन हजार 104 झाली. त्यात सोमवारी मध्यरात्री बारापासून मंगळवारी रात्री पावणेनऊ वाजेपर्यंत तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या 196 जणांचा समावेश आहे. आजपर्यंत एक हजार 864 जण बरे होऊन घरी गेले आहेत. आज 57 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या एक हजार 193 जणांवर उपचार सुरू असून, आजपर्यंत 47 जणांचा मृत्यू झाला आहे. आज अण्णासाहेब मगरनगर चिंचवड येथील 35 वर्षीय पुरुष, इंदिरानगर चिंचवड येथील 75 वर्षीय पुरुष यांचा मृत्यू झाला. तसेच, शहराबाहेरील इंदिरानगर खडकी बाजार येथील 59 वर्षीय महिला व मुलुंड मुंबई येथील 58 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. 

आज चाचणी अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आलेले रुग्ण भीमनगर पिंपरी, बौध्दनगर निगडी, संजयनगर-निगडी, चंद्रलोक बिल्डिग - निगडी, पिंपळे निलख, गांधीनगर- खराळवाडी, निगडी प्राधिकरण, समर्थचौक-वाकड, रुपीनगर, यमुनानगर, संतोषनगर थेरगाव, भोसले चाळ- नेहरुनगर, चक्रपाणी रोड -भोसरी, साई पार्क- नेहरुनगर, दिघी रोड -भोसरी, पटेल गार्डन- जुनी सांगवी, मोरेवस्ती- चिखली, गवळीनगर भोसरी, जवळकरनगर- कासारवाडी, पेशवेनगर- कासारवाडी, भारतमातानगर- दिघी, महेंद्रा-खराळवाडी, गंगास्काईज पिंपरी, विजयनगर- काळेवाडी, संत तुकारामनगर - पिंपरी, महात्मा फुलेनगर -भोसरी, आदर्शनगर काळेवाडी, इब्राहिम मशिद परिसर-कासारवाडी, तापकिरनगर काळेवाडी, सुदर्शननगर-वाकड, सुदर्शननगर- पिंपळे गुरव, टोलनाका- मोशी, भंडारी पेट्रोल पंप कासारवाडी, लांडेनगर-भोसरी, गुळवे वस्ती- भोसरी, राजीव गांधी वसाहत- नेहरुनगर, आळंदी रोड-भोसरी, पवार वस्ती-चिखली, शितलबाग भोसरी, जैनमंदिर -भोसरी, इंद्रायणीनगर-भोसरी, धावडेवस्ती-भोसरी, प्रेमलोक पार्क, आंबेडकर कॉलनी पिंपरी, कालभैरव सोसायटी निगडी, भाटनगर पिंपरी, विठ्ठलनगर नेहरुनगर, मोनिका बिल्डींग पिंपरी, वाल्हेकरवाडी, शेडगेवस्ती वाकड, विनोदेनगर वाकड, भुमकर चौक थेरगाव, अशोकनगर-पिंपरी, आदर्शनगर-पिंपरी, केशवनगर -कासारवाडी, संत ज्ञानेश्वर कॉलनी- काळेवाडी, चैत्रबन सोसायटी सांगवी, नटराज सोसायटी नेहरुनगर, मोरेवस्ती चिखली, हनुमान मंदिर पिंपरी, बिजलीनगर, तानाजीनगर चिंचवड, गांधी वसाहत, जोतिबानगर काळेवाडी, आळंदी रोड भोसरी, मासुळकर कॉलनी, मिलिंदनगर पिंपरी, शास्त्री चौक -भोसरी, आधारनगर- पिंपरी, लांडेवाडी -भोसरी, जयभीमनगर दापोडी, नवमहाराष्ट्र स्कुल- पिंपरी, बोपखेल, संभाजीनगर, सासवड, बावधन, देहूगाव, बोपोडी येथील रहिवासी आहेत. 

आज पिंपरी, रामनगर चिंचवड, अजंठानगर, बोपखेल, अंकुश चौक निगडी, विठ्ठलनगर, सिध्दार्थनगर दापोडी, शिवक्‍लासिक -मोशी, चऱ्होली, आकुर्डी, सुदर्शनगर - चिंचवड, लिंकरोड - पिंपरी, पिंपळे गुरव, भाटनगर, फिनोलेक्‍स कॉलनी -काळेवाडी, तापकिरनगर काळेवाडी, दिघीरोड -भोसरी, डिलक्‍स मॉल, काळभोरनगर चिंचवड, काटेपुरम-सांगवी, शास्त्री चौक-भोसरी, मधुबन-सांगवी, मिलिंदनगर-चिंचवड, वाल्हेकरवाडी, इडुळगाव, वैदुवस्ती-पिंपळे गुरव, रामनगर-रहाटणी, वरदहस्त-पिंपरी, महात्मा फुले नगर -भोसरी, गांधी वसाहत-नेहरुनगर, नेहरुनगर, व्यंकटेश पार्क-थेरगाव, नेहरु चौक -दापोडी, बिजलीनगर, पंचशिलनगर, भारतमातानगर दिघी, सेक्‍टर चार मोशी, लिंबोरे वस्ती दापोडी, मोरवाडी, नानेकर चौक चिखली, कामगारनगर-पिंपरी, कासारवाडी, नितेशनगर पिंपरी, पाटीलनगर चिखली, ग्रीन एन्मायर चिखली, भोईआळी चिंचवडगाव, संभाजीनगर, भोसरी, एचडीएफसी कॉलनी चिंचवड, क्रांतीनगर आकुर्डी, जयभीमनगर दापोडी, गुलाबनगर दापोडी, बौध्दनगर पिंपरी, पंचतारानगर आकुर्डी, अष्ठविनायक कॉलनी काळेवाडी, संभाजीनगर चिंचवड, इंदिरानगर चिंचवड, जाधव चौक दापोडी, चक्रपाणी वसाहत भोसरी, तापकिरनगर मोशी, भवानीनगर पिंपळे गुरव, गांधीनगर खराळवाडी, हनुमाननगर चिखली, रमाबाईनगर पिंपरी, सोनिगरा चिंचवड, दत्त मंदिर वाकड, वल्लभनगर पिंपरी, इंद्रायणीनगर, चिंचवड, टिळकनगर थेरगाव, नखातेनगर थेरगाव, देहूरोड, रहाटणी, विश्रांतवाडी, क्रांतीनगर आळंदी, खडकी, बोपोडी येथील रहिवासी असलेले कोविड- बाधित रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com