
पिंपरी : सोसायटीतील रहिवाशांना शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार चऱ्होली येथे घडला.
हेही वाचा - Corona Vaccine Update : भारतात 16 लाखाहून अधिक लसीकरण; जगभरात काय अवस्था?
रूपाली झलाणी, सिमरण कौर गील, स्वीटी भिष्मलाल सचवाणी (सर्व रा. किंग्जबेरी सोसायटी, प्राईड वर्ल्ड सिटी, चऱ्होली), दर्शन आंधळे, रजत अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ज्ञानेश्वर बाबुलाल राठोड (रा. पुणे-आळंदी रोड, देहूफाटा) यांनी फिर्याद दिली आहे.
हे वाचा - तात्काळ राजीनामा द्या नाहीतर महाभियोग आणू; ट्रम्प यांना इशारा
आरोपींनी बेकायदा जमाव जमवून कोणताही भाडेकरार नसताना प्राईड वर्ल्ड सिटीतील किंग्ज बेरी सोसायटीत रहायला आले. सोसायटीच्या आवारात येण्यास प्रतिबंध केला असतानाही दर्शन आंधळे व रजत यांनी सोसायटीत बेकायदारित्या शिरण्याचा प्रयत्न केला. त्यांना विरोध केल्याने आरोपींनी सोसायटीतील रहिवाशांना शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली. दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून अधिक तपास सुरु आहे.
हे वाचा - शक्तीशाली ट्रम्प यांच्यावर अटकेची टांगती तलवार; उरले दोनच पर्याय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.