कोरोनामुळे शहरातील ८७ बालके झाली पोरकी

कोरोनामुळे अनेक कुटुंबातील आई-वडिलांचे छत्र हरपले आहे. संसर्ग होऊन कोणाचे बाबा; तर कोणाची आई हिरावली आहे.
Corona Virus
Corona VirusSakal

पिंपरी - कोरोनामुळे (Corona) अनेक कुटुंबातील (Family) आई-वडिलांचे (Mother Father) छत्र हरपले आहे. संसर्ग होऊन कोणाचे बाबा; तर कोणाची आई हिरावली आहे. ज्यांचे आई किंवा वडील कोरोनामुळे मृत्यू (Death) पावले, अशी ८७ बालके पोरकी (Orphan) झाली आहेत; तर एका चिमुकल्याचे आई आणि वडीलही राहिले नसून त्याच्या वाटेला अनाथपण आले आहे. (87 Childrens Orphan by Corona in Pimpri Chinchwad City)

कोरोनाच्या विळख्यात अनेक कुटुंबे सापडली आहेत, यात कर्ती माणसे जग सोडून गेली. या बालकांची काळजी घेणारे कोणीही नसल्याने ही बालके शोषणास बळी पडण्याची तसेच बालकामगार, बालभिक्षेकरी किंवा मानवी तस्करीत सापडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने देखील टास्क फोर्स गठित करण्याचे निर्देश दिले होते. अशा छत्र हरपलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी महापालिकेने बाल संगोपन योजनेंतर्गत १८ मे रोजी टास्क फोर्स स्थापन केली. या टास्क फोर्सच्यावतीने कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या वयानुसार शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचे सर्वेक्षण सुरू आहे.

Corona Virus
पिंपरी : 'म्यूकरमायकोसिस'वरील इंजेक्शनची काळ्या बाजाराने विक्री

आई व वडील नाहीत, अशा एका मुलाचा शोध शहरात लागला आहे. दोन्ही पालकांचा मृत्यू झालेल्या बालकांच्या मदतीसाठी महापालिकेच्या ८८८८००६६६६ हा चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक असून, त्यावर माहिती देण्याचे आवाहन केले आहे. पालकांच्या पाल्यांची माहिती घेण्याबरोबरच त्या बालकांची देखील माहिती संकलित केली जात आहे. ज्यांना काळजी आणि सरंक्षणाची गरज आहे. याची माहिती देखील शासनस्तरावर पाठविण्यात येत आहे. मंगळवार दुपारपर्यंत आलेल्या माहितीनुसार ८७ बालके अनाथ झाली असून, एका बालकांचे आई-वडील कोरोनाने हिरावले आहेत, अशी माहिती कृती दलाच्या त्रिसदस्यीय समितीने दिली.

‘अनाथ झालेल्या बालकांना परस्पर कोणीही दत्तक घेऊ नये किंवा कोणीही देऊ नये. अशा मुलांची माहिती देण्यासाठी टास्क फोर्सच्या अधिकारी यांच्याशी संपर्क करावा. असे आवाहन प्रशासनाने केले आहे. यासाठी महापालिकेच्या ८८८८००६६६६ हा चाइल्ड हेल्पलाईनवर संपर्क साधावा.’

- अजय चारठाणकर, उपायुक्त, नागरवस्ती विकास योजना विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com