धक्कादायक : मोशीत वाहतूक पोलिसाच्या अंगावर ट्रक घालून जिवे मारण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 September 2020

  • हा प्रकार मोशीतील भारतमाता चौक येथे घडला

पिंपरी : वाहतूक नियमन करीत असताना ट्रकचालकाला थांबण्याचा इशारा केला असता, त्याने वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याच्या अंगावर ट्रक घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार मोशीतील भारतमाता चौक येथे घडला. 

पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा लॉकडाउन?

पिंपरी-चिंचवडकरांनो सावधान! थुंकल्यास होणार हजार रुपयांचा दंड 

शंकर हिरामण रोकडे (वय 35, रा. राहुल चौक, राजगुरूनगर) यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी ट्रकचालक राहुल अशोक दातीर याच्यावर गुन्हा दाखल झाला. फिर्यादी हे भोसरी वाहतूक विभागात कार्यरत असून, शनिवारी (ता.12) सायंकाळी सातच्या सुमारास ते मोशीतील पुणे-नाशिक महामार्गावरील भारतमाता चौक (देहूफाटा) येथे कर्तव्यावर होते. वाहतूक नियमन करीत असताना (एमएच. 42, बी.8456) या क्रमांकाच्या ट्रकवरील चालक राहुल दातीर याला थांबण्याचा इशारा केला. मात्र, त्याने ट्रक न थांबविता फिर्यादीकडे रागाने पाहत त्यांच्या अंगावर ट्रक घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ट्रकचालक पुढे निघून गेला. 

पवना जलवाहिनीचे काम पुन्हा सुरू होणार 

फिर्यादीने दुचाकीवरून ट्रकचा पाठलाग केला. ट्रकला ओव्हरटेक करीत थांबण्याचा इशारा केला असता ट्रकचालकाने खोडसाळपणे फिर्यादीची दुचाकी डाव्या बाजूला दाबून त्यांना पुन्हा जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आरोपीवर भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न तसेच, सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: attempted murder by putting a truck on traffic policeman at moshi