कौतुकास्पद : नेत्रदानाबाबत भोसरीतील 'या' सोशल फाउंडेशनचं काम उल्लेखनीय 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 August 2020

  • भोसरीतील नेत्रदान चळवळीची दशकपूर्ती
  • दिव्यांगांना जग पाहण्याची दिली संधी 

भोसरी : नेत्रदानाविषयी जनजागृती करून अंध व्यक्‍तींना 'डोळस' करण्याचा वसा घेतलेल्या सोशल फाउंडेशनने आपल्या 'प्रकाशमान' कामाची दशकपूर्ती केली आहे. दहा वर्षांच्या कालावधीत जवळपास शंभरपेक्षा अधिक अंध व्यक्‍तींना हे सुंदर जग पाहण्याची संधी या संस्थेच्या तरुणांमुळे मिळाली आहे. 

गौरीपूजेला लागणारी फुले कुठून अन् कशी येतात माहितीय का? नसेल तर घ्या जाणून

नेत्रदान चळवळ अधिक रुजविण्यासाठी आणि बळकट व्हावी, यासाठी भोसरीतील तरुणांनी 17 ऑगस्ट 2010 रोजी जागृती सोशल फाउंडेशनची मुहूर्तमेढ रोवली. या फाउंडेशनमधील अतुल घाटगे यांनी नेत्रदानाच्या सामाजिक चळवळीची सुरुवात घरापासून केली. अतुल यांचे वडील कै. दिलीप घाटगे यांच्या निधनानंतर वैयक्‍तिक दु:ख बाजूला सारून त्यांच्या वडिलांचे नेत्रदान केले. त्यांची ही कृती भविष्यात नेत्रदानाची चळवळ ठरली. या संस्थेच्या नेत्रदान चळवळीतून 66 जणांनी नेत्रदान केले असून, शंभर जणांना यामुळे दृष्टी प्राप्त झाली आहे.

गणेश मूर्तींचे विसर्जन कुठं करायचं? शिवसेनेचा सवाल

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 
संस्थेच्या आतापर्यंतच्या वाटचालीत राम फुगे, नीलेश धावडे, डॉ. अनिल काळे, विश्‍वास काशीद, अविनाश फुगे, दिनेश लांडगे, स्वप्नील फुगे, अक्षय तापकीर, सागर माळी, कविता स्वामी, विनय पाटील, सौरभ घारे, राहुल खाचने, संतोष नवलाखा, राजू दौंडकर, नीलेश पाटील शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांचे मोलाचे योगदान आहे. 

भोसरी : महापालिकेकडून होणार बाप्पाचं विसर्जन 

66 वे नेत्रदान 

शहरातील गोविंद परशुराम खवणेकर यांचे निधन झाले. त्याठिकाणी उपस्थित असलेले महेश लाकाळ यांनी खवणेकर यांचे चिरंजीव दत्तप्रसाद आणि मुलगी दीपाली नाईक यांच्याशी चर्चा करीत नेत्रदानाबाबत सकारात्मक निर्णय घेतला. बिर्ला रुग्णालयातील डॉ. रामदास यांच्याशी संपर्क साधत कै. गोविंद खवणेकर यांचे नेत्रदान करून घेण्यात संस्थेला यश आले. यासाठी कुटुंबीयांचे सहकार्य खूपच महत्त्वाचे ठरले. यापूर्वी महेश लाकाळ यांनी त्यांच्या आईचे नेत्रदान केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: awareness about eye donation through jagruti social foundation bhosari