
स्टिकर लावले आणि काचा वर केल्या की मोटारीत नेमके कोण आहे हे समजत नाही.शिवाय त्यांना प्रशासन व नागरिकांकडून सन्मान दिला जातो.तसेच रस्त्यावर कोठेही वाहने उभी केली तरी वाहतूक पोलिसांकडून कारवाई होत नाही
पिंपरी - पिंपरी, चिंचवड व भोसरी या मतदारसंघाचे मिळून तीन आमदार आहेत. मात्र, "आमदार' असे स्टिकर लावलेल्या सुमारे डझनभर मोटारी फिरत आहेत. स्टिकर लावले आणि काचा वर केल्या की मोटारीत नेमके कोण आहे हे समजत नाही. शिवाय त्यांना प्रशासन व नागरिकांकडून सन्मान दिला जातो. तसेच रस्त्यावर कोठेही वाहने उभी केली तरी वाहतूक पोलिसांकडून कारवाई होत नाही.
Makar Sankranti 2021: मकर संक्रांत आणि पतंगाचं कनेक्शन काय?
आमदार असे स्टिकर लावलेली तब्बल पाच वाहने फक्त चिखलीमध्ये आढळल्या आहेत. यामध्ये तीन इनोव्हा, एक फॉर्च्युनर व एक ऑडी गाडीचा आहे. काही वाहने भोसरी व इतर भागात आहेत. संपूर्ण शहरातील अशा "आमदारां'ची संख्या बारा होती. या पैकी तीन आमदारांच्या तीन गाड्या वगळल्या तर बाकी गाड्या कोणाच्या? याविषयी संभ्रम आहे. सर्वसामान्य माणसाने आपल्या वाहनाच्या नंबर प्लेटवर काही लिहिले तरी वाहतूक विभागाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात येते. मात्र, असे स्टिकर लावून फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कोणतीही कारवाई का होत नाही? असा सवाल नागरिकांचा आहे.
ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली जाहीर; विमानसेवा सुरु
नियम सर्वसामान्यांसाठीच का?
स्टिकरची एक गाडी तर क्षेत्रीय कार्यालय अध्यक्षाची आहे. तळवडे वाहतूक पोलिस कारवाईसाठी उभे असलेल्या ठिकाणापासून अवघ्या दोनशे मीटरवर वाहने उभी असतात. कायदा, नियम हे केवळ सर्वसामान्य जनतेसाठीच असतात का? असा प्रश्न वाहनचालकांकडून विचारला जात आहे.