
तळेगाव स्टेशन - आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत तळेगाव-चाकण रस्त्यावर २०१७ मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. त्यांची आता दुरवस्था झाली असून, सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
तळेगाव-चाकण रस्ता आणि स्टेशन चौक ते इंद्रायणी महाविद्यालयदरम्यान एक किलोमीटरच्या टप्प्यात तत्कालीन आमदार बाळा भेगडे यांच्या निधीतून सुमारे दहा लाख रुपये खर्चून सहा सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. हे कॅमेरे साधारणतः वर्षभर कार्यान्वित होते. त्यानंतर नगरपरिषद प्रशासनाकडून देखभालीसाठी ठेकेदार नेमला न गेल्यामुळे बहुतांश कॅमेरे बंद झाले. जनरल हॉस्पिटल प्रवेशद्वाराजवळच्या पोस्ट ऑफिसशेजारील पोलिस चौकीमध्ये कॅमेऱ्यांचा नियंत्रण कक्ष ठेवला होता, त्याचीही दुरवस्था झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून सीसीटीव्ही यंत्रणा काम करीत नाही. परिसरात अपघात किंवा काही गुन्हेगारी घटना घडल्यास पोलिसांना तपासासाठी व्यावसायिकांच्या खासगी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आधार घ्यावा लागतो. गेल्या आठवड्यात मराठा कर्णाती चौकात बॅंकेतून काढलेली रक्कम लांबविल्याचा प्रकार घडला. चौकातील कॅमेरा बंद असल्याने पोलिसांना एका मेडिकल व्यावसायिकाच्या डीव्हीआरची मदत घ्यावी लागली. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने पर्यायी नियंत्रण कक्षाची व्यवस्था करून सर्व सीसीटीव्ही कॅमेरे पूर्ववत करावेत.
हेही वाचा : पाण्यासाठी आणखी किती पैसे मोजायचे?
पोलिसांना तपासकामी सीसीटीव्ही यंत्रणेची मदत होते. मात्र, कित्येक वर्षांपासून बंद असलेली सीसीटीव्ही यंत्रणा दुरुस्तीबाबत नगरपरिषद प्रशासनाने उपाययोजना केलेली नाही.
- सुरेश शिंदे, स्थानिक रहिवासी
तळेगावातील मुख्य रस्त्यांवरील सक्षम व्यावसायिक, तसेच बॅंका आणि एटीएम केंद्रावर किमान एक तरी सीसीटीव्ही कॅमेरा रस्त्याच्या दिशेने सेट केलेला असावा. या संदर्भात व्यावसायिकांना आदेश देणार आहोत. बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्तीबाबत नगरपरिषदेला पत्राद्वारे कळवले जाईल. शहरातील महत्त्वाची आणि वर्दळीची ठिकाणे सीसीटीव्हीच्या दृष्टिक्षेपात आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
- भास्कर जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, तळेगाव दाभाडे
तांत्रिक बाजूंची तपासणी करून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखभालीची निविदा काढली जाईल.
- दीपक झिंजाड, मुख्याधिकारी, नगरपरिषद, तळेगाव दाभाडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.